शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

बँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट

जखम झाल्यास किंवा कट लागल्यास सर्वप्रथम डोक्यात येणारी अशी गोष्ट ज्याने आपण निश्चिंत होऊन जातो ती आहे बँड- एड. या पट्टीमुळे आपली जखम बॅक्टीरिया आणि इतर धोक्यांपासून सुरक्षित राहते आणि पटकन भरूनही जाते. आता आपल्या मनात ही गोष्ट येत असेल की याची उत्पत्ती झाली तरी कशी? आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की बँड- एड निर्माण करण्यामागे एक रोमँटिक कहाणी आहे.
अर्ल डिक्सन जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी काम करत होते. त्यांचे लग्न जोसेफाइन नाइट नावाच्या मुलीशी झाले. दोघांचे एकमेका खूप प्रेम होते. पण अर्लच्या पत्नीला घरगुती काम करताना वारंवार जखम व्हायचा. किचनची सफाई करताना, जेवण तयार करताना हाताला कट लागून जायचं. अशात कोणतेही औषध टिकून राहायचे नाही. आणि वेदना व्हायच्या. तेव्हा अर्लने एक आयडिया केली. त्याने टेपच्या चौरस पट्ट्या कापल्या त्यावर गॉज आणि औषध लावले. अश्या पट्ट्या त्याने तयार करून ठेवल्या ज्या जखम झाल्याबरोबर लावता येतील.
 
जेव्हा जॉन्सन अँड जॉन्सनला या पट्ट्यांबद्दल कळलं ज्या 30 सेकंदापेक्षा कमी वेळात जखमेवर लागून जातात तेव्हा तो आयडिया त्यांना जाम पटला. या आयडिया एवढा गाजला की 1924 साली तर डिक्सन यांना कंपनीचे वाइस प्रेसिडेंट नियुक्त केले गेले. त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये स्थान मिळाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत बँड- एड दुनियेत सर्वात पसंत केली जाणारी आणि घरोघरी सापडणारी वस्तू झाली.