testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्राण्यांचा पावसाळा

dog
Last Modified सोमवार, 14 जुलै 2014 (17:36 IST)
बालमित्रांनो, पावसाळ्यातील पावसाची रिपरिप..... वातावरणातील गारठा अन् दमटपणा यामुळे एक वेगळेच वातावरण असते. या वातावरणाचा मानवाबरोबरच पशुपक्ष्यांवरदेखील काय परिणाम होतो हे जाणून घेऊ....
भू भू कुत्रा>
> माणसाच्या सगळ्यात जवळता प्राणी म्हणजे कुत्रा. सध्या पावसाळ्यात आपल्या कुत्र्यांचं वेळापत्रक म्हणजे खायचं, प्यायचं आणि झोपायचं. कुत्र्यांना पावसाळ्यात भिजायला खूप आवडतं. पण शक्यतो पावसाळ्या ते जास्त बाहेर पडत नाहीत. कारण वारा आणि विजांचा कडकडाट याला ते खूप घाबरतात. रस्त्यावर राहणारे कुत्रेही आसर्‍यासाठी आडोसा शोधतात. इतर वेळी घरी शाकाहार आणि मांसाहार करणारे कुत्रे इतर वेळी घरी मात्र फक्त दूधभात किंवा डॉग फूड खाणंच पसंत करतात. पावसाळ्याच्या थंडीत ते माणसाच्या कुशीत शिरून झोपतात.

crow
काऊदादा


कावळा हा तसा काही आपला फारसा आवडता पक्षी नाही. पण पावसाळ्यात मात्र त्यांची दया येते. एक छानसं झाड शोधून तो आपल्या निवार्‍याची सोय करून ठेवतो. पण अन्नासाठी मात्र काही कावळ्यांनी एक युक्ती शोधली आहे. काही घरांमध्ये ते न चुकता बरोबर जातात. कावकाव करतात. पोळी देईपर्यंत तिथेच बसतात आणि मग पोळी देणार्‍याच्या चक्क हातातून पोळी घेतात. आहे की नाही गंमत.



kabutar
गुटूर गू कबुतर


राखाडी रंगाची कबुतरं पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतात. पावसात भिजल्यानंतर कबुतरांच्या मानेवरचा निळसर-हिरवा पट्टा खूप आकर्षक दिसू लागतो. झाडांवर किंवा इमारतींच्या आडोशाला दिसणारी कबुतरं पावसात अनेकदा मनसोक्त भिजताना दिसतात.

chimni
चिवचिव चिऊताई


चिऊताई म्हणजे इवलासा पक्षी. पावसाळा सुरू व्हायच्या आधी ती आपल्या घरट्याची सोय करून ठेवते. काट्याकुट्या, वाळलेली पानं, गवत यांचा वापर करून पावसाळा सुरू होण्याच्या आधी चिमणीच घरटं बांधून तयार असते. एखादं मोठ्ठं झाड पाहून त्यावर भक्कम घरटं बांधून ठेवते. आपल्या पिलांना जपण्याचा पूर्ण प्रयत्न असतो तिचा.

kombdi
कूकूच कू


सकाळी बांग देऊन आपल्याला सगळ्यांना उठवणारा कोंबडा पावसाळा असो व हिवाळा, आपलं काम चोख बजावतो. पण एरवी दिवसभर उत्साहाचा झरा असलेला कोंबडा पावसाळ्यात दिवसा मात्र आळसावतो. हवेतील गारवा आणि आकाशातलं मळभ यामुळे तो बाहेर हुंदण्यापेक्षा घरीच बसणं पसंत करत असतो.



यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

RRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...

national news
RRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...

दुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय

national news
दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...