बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (18:28 IST)

ओळखा काय आहे हे, डोकं खाजवा

1 हिरव्या रानात एक पांढरे घर त्या घरात एक लाल खोली त्या खोलीत काळे शिपाई सांगा मी कोण ?
 
2 अशे कोणते टेबल आहे जे आपण खातो.
 
3 एका नारळाच्या झाडावर एक खारू ताई, माकड आणि ससा खेळत असतात, सांगा आधी सफरचंद कोणाला दिसणार?

4 डोळा आहे तरी ही आंधळी सांगा मी कोण?

5 मी असे फळ आहे ज्याचा पोटात दात असतात सांगा मी कोण आहे?
 
6 दोन अक्षरांचे माझे नाव, उन्हात पडतं माझ्याशीच काम ओळखा मी कोण?
 
7 माझ्या डोळ्यात बोट घाल्यावर माझे तोंड उघडते कोण आहे मी?
 
8 रंग माझा हिरवा तोंड माझे लाल, खातो मी हिरवी मिरची सांगा माझे नाव

9 अशी कोणती गोष्ट आहे जी एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते पण आपल्या जागेवरून हलतच नाही.
 
10 अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिताच मरून जाते ?
 
1 उत्तर -कलिंगड
2 उत्तर -व्हेजिटेबल
3 उत्तर -कोणालाच नाही (नारळाच्या झाडाला सफरचंदं येत नाही)
4 उत्तर - सुई 
5 उत्तर - डाळिंब 
6 उत्तर- टोपी  
7 उत्तर - कात्री
8 उत्तर - पोपट 
9 उत्तर - वाट 
10 उत्तर- आग