शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2015 (17:17 IST)

सुट्टीचा आनंद

उन्हाळा म्हणजे मुलांसाठी सुट्टीचे दिवस आणि दिवसभर मुलं घरात राहणार म्हणजे पालकांच्या डोक्याला काळजी की अता मुलं दिवसभर टीव्ही, इंटरनेट किंवा कॅम्प्यूटर, मोबाइल गेम्सशिवाय राहणार नाहीत. मग अश्यावेळी पालक एखाद्या समर कँपमध्ये मुलांना अडकवून स्वत:ची जबाबदारी पार पाडतात. पण प्रत्यक्षात याने मुलांचा विकास होतोच असे नाही. आपल्या मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या सुट्टीचे नियोजन केले पाहिजे. तर मुलांना सुट्टीचा आनंद मिळेल.


* सहा ते दहा या वयाच्या मुलांना हस्तकला, चित्रकला किंवा नाट्यकला शिबिरात पाठवू शकता. या वयात त्यांच्या वाचनाचा वेग वाढविण्यासाठी आणि त्यांना वाचनाची आवड लागावी यासाठीही रंगीन कॉर्टून कॉमिक्स आणायला हरकत नाही.

* दहा वर्षांच्या वयाच्या मुलांना आउटडोर अॅक्टिव्हिटीसाठी पाठवायला हरकत नाही. त्यात गिर्यारोहण, रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग व इतर अॅक्टिव्हिटींचा समावेश होऊ शकतो. अश्या कँपमुळे मुलांची शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास होतो. अश्या कँपमध्ये पाठवल्याने मुलांना सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची सवय लागते.

* कायम शहराच्या गर्दीत राहण्यार्‍या मुलांना निसर्गशिबिरमध्ये पाठवू शकता. अशाने मुलांना जंगल आणि तिथली हिरवाई, स्वच्छ वातावरणचा अनुभव मिळेल.

* आपल्या बिझी शेड्यूलमधनू वेळ काढून मुलांसोबत सायकल ट्रीप जाणे, बागेत फिरणे किंवा एखाद्या चित्रपट पाहणे हा ही चांगला पर्याय ठरेल.

* शाळा असताना मुलं बिझी असतात म्हणून सुट्टीच्या काळात त्यांना काही कामे नेमून द्यावी. ज्याने त्यांना कामाची सवयही लागते. बाजारातून सामान आणणे, बिलं भरणे किंवा घराची सफाई करणे, पाट-पाणी घेणे व इतर कामे त्यांना नेमून दिल्याने त्यांना कामांची किंमत तर कळेलच वरून व्यावहारिक जगात कसे वागायचे याचीही कल्पना येईल.