testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जातकाला कंगाल बनवून देतो केमद्रुम योग

बर्‍याच वेळा असे बघण्यात येते की माणसाजवळ सर्व काही असूनही तो कंगाल किंवा निर्धन होऊन जातो. अत्यंत परिश्रम केल्यानंतर देखील त्याचे फळ त्याला मिळत नाही. हे काही बर्‍याच वेळा जातकाने केलेले कर्म व ग्रह-नक्षत्रांमुळे ही होणे शक्य आहे. शास्त्रानुसार पारिजात, उत्तर कालामृत, जातक तत्वम समेत असे बरेच योग आहे जे माणसाला निर्धन किंवा दिवाळखोर बनवतो.

असे योग असलेल्या जातकांना जीवनात एकदा तरी ‍ गरिबीचा निर्धनतेचा सामना करावा लागतो. प्रबल केमद्रुम योग असणार्‍या लोकांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम संस्कार फारच अडचणीत होतो.

काय आहे केमद्रुम योग?

लग्न चक्राच्या विविध योगांमध्ये केमद्रुम योग एक असा योग आहे, ज्यामुळे जातकाला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा चंद्र कुठल्याही घरात एकदम एकटा असतो व त्याच्या आजू बाजूच्या दोन्ही घरात एकही नसेल तर अशा स्थितीत केमद्रुम योगाची सृष्टी होते. पण या केमद्रुम योगाला आम्ही सहन करू शकतो कारण अशा परिस्थितीत ग्रह शांती आणि काही उपाय केल्यानंतर जातक गरिबीने बाहेर येऊ शकतो.

पण जेव्हा चंद्रावर एकाही शुभ ग्रहाची दृष्टी पडत नसेल, तो स्वयं पापी, क्षीण अथवा नीचस्तंगत असेल आणि पापी व क्रूर ग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडत असेल तर अशा वेळेस केमद्रुम योगाची सृष्टी होते. असा योग असणारा जातक जन्मभर कंगाल राहतो. या दशेत व्यक्तीला भीक मागून आपले जीवन व्यतीत करावे लागते.


यावर अधिक वाचा :