1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मंत्र जपण्यासाठी शुभ वेळ, आसन आणि माळ

shubh muhurat
देवाची आराधना करताना आम्ही मंत्रोच्चार करतो परंतू काय आपल्याला माहीत आहे मंत्र साधना तेव्हा सिद्ध ठरते जेव्हा ती साधना योग्य वेळी, ‍अर्थात योग्य तिथी आणि नक्षत्र बघून करण्यात आली असेल. तर बघू कोणती आहे ती योग्य:
 
उत्तम महिना - कार्तिक, आश्विन, वैशाख, माघ, मार्गशीर्ष, फाल्गुन आणि श्रावण, हे महिने उत्तम आहेत.
उत्तम तिथी - मंत्र जप हेतू पोर्णिमा, पंचमी, द्वितीया, सप्तमी, दशमी आणि ‍त्रयोदशी तिथी उत्तम असते.
उत्तम पक्ष - शुक्ल पक्षात शुभ चंद्र आणि शुभ दिवस पाहून मंत्र जप केला पाहिजे.
शुभ दिन - रविवार, शुक्रवार, बुधवार आणि गुरुवार मंत्र साधना साठी उत्तम ठरतं.
उत्तम नक्षत्र - पुनर्वसू, हस्त, तिन्ही उत्तरा, श्रवण, रेवती, अनुराधा आणि रोहिणी ‍नक्षत्र मंत्र सिद्धी हेतू उत्तम असतात.
 
तसेच मंत्र साधना मध्ये साधन आसन आणि माळ याचेही महत्त्व असतं.
आसन - मंत्र जप करताना कुशासन, मृग चर्म, बाघम्बर आणि लोकरीने तयार केलेले आसन उत्तम असतात.
माळ - रुद्राक्ष, जयन्तीफळ, तुळस, स्फटिक, हत्ती दात, लाल मूंगा, चंदन आणि कमळाची माळ याने जप सिद्ध होतं. तरी सर्वांत रुद्राक्षाची माळ सर्वोत्तम ठरते.