गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

श्रीमंत होणे सोपे, मनाच्या शक्तीने पूर्ण होईल मनोकामना, वाचा 5 गुपित गोष्टी

धनवान बनण्यासाठी असे गुपित गूढ आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता. ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे 5 गुपित येथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल. 
 
पहिलं गुपित
विश्वास ठेवा की आपण श्रीमंत आहात
आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. स्वत:ला श्रीमंत समजावं लागेल. विश्वासात खूप ताकद असते. विचार बदला भविष्य बदलेल. स्वत:ला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात.
 
दुसरं गुपित
धन्यवाद म्हणायला शिका
प्रत्येकजण परमेश्वराकडे काही न काही याचना करत असतो परंतू धन्यवाद देण्यासाठी किती लोकं जातात? आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर, प्रकृती किंवा निगडित व्यक्तीला देखील हृद्यापासून धन्यवाद म्हणायला हवं. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे.
 
तिसरं गुपित
ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे
ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे, परंतू आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्या मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची याचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होयपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो.
 
चौथं गुपित
वास्तू नियम पाळा
घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धन वर्षा होत असलेलं चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कौड्या, तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी.
 
पाचवं गुपित
रात्री पैसे मोजून झोपावे
10, 50 किंवा 100 च्या नोटांची एक गड्डी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे.