बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (11:37 IST)

कार्यक्षमता वाढवू शकतो खराब मूड

शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून काही बाबतीत चांगल्या मूडचा कामकाजावर नकारात्क प्रभाव पडतो, असे त्यात दिसून आले. या अधययनामध्ये शास्त्रज्ञांनी 95 लोकांचा समावेश केला होता. या सगळ्यांना नऊ वेगवेगळी कामे व प्रश्र्नावली दिली. त्याआधारे मूड, भावनात्मक प्रतिक्रिया व विविध कामातील स्मरणशक्ती आणि विश्लेषणात्मक आव्हानांच्या परस्पर क्रियांचे आकलन करण्यात आले. या अध्ययनाचे प्रमुख तारा मॅकऑले यांनी सांगितले की, काही लोकांसाठी खराब मूड खरे तर त्यांच्या समजून-उमजून घेण्याच्या क्षमतेला धारदार बनविण्याचे काम करतो. अशी क्षमता दैनंदिन कामांसाठी आवश्यक आहे, असे दिसून आले. बर्‍याचदा खराब मूडमध्ये काम करतेवेळी व्यक्तीच्या भावनात्मक  प्रतिक्रिया चांगल्या होतात. त्यामुळे त्याच्या कामात अचूकता व गती येते, असेही तारा यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे कमी प्रतिक्रियाशील लोकांमध्ये त्याचा उलट परिणाम पाहण्यास मिळतो. अशा लोकांकडून खराब मूडमध्ये केलेले काही दर्जाहीन होते.