बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (00:34 IST)

स्मार्टफोनचा स्मृतीवर होऊ शकतो परिणाम

काही लोक सतत स्मार्टफोनमध्ये डोके खुपसून असतात. तुम्हालाही स्मार्टफोनचा अतिवापर करण्याची सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. एका ताज्या अध्ययनात असा इशारा देण्यात आला आहे की, जास्त वेळपर्यंत मोबाइल फोनच्या विकिरणाचा किशोरवयीन मुलांच्या स्मृतिवर परिणाम होऊ शकतो. विकिरण मेंदूतील खास भागामध्ये स्मृतीसंबंधीच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम करू शकते. किशोरवयातील सुमारे 700 मुलांच्या केलेल्या अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्वीत्झर्लंडमधील स्वीस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात ताररहित दूरसंचार उपकरणांची रेडियोफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्रेटिक फील्ड (आरएफ-ईएमएफ) आणि किशोरांमधील स्मृतिसंबंधी क्षमतेदरम्यानचा संबंध जाणून घेण्यात आला. त्यात असे दिसून आले की, एक वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत मोबाइलफोनच्या वापरादरम्यान मेंदूपर्यंत पोहोचलेल्या रेडियोफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅ ग्रेटिक फील्डमुळे स्मृतिसंबंधी क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अर्थात हेडफोन वा लाउडस्पीकरचा वापर करून हा धोका कमी केला जाऊ शकतो, असे या अध्ययनाचे प्रमुख मार्टिन रुसली यांनी सांगितले.