बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (16:43 IST)

सॅमसंग बाजारात आणत आहे पहिला एंड्रॉयड गो स्मार्टफोन

मोबाइल निर्माता कंपनी सॅमसंगने आपल्या पहिला एंड्रॉयड गो स्मार्टफोनची टेस्टिंग सुरू केली आहे.  सॅमसंगचा हा फोन लवकरच गॅलॅक्सी जे2 कोरच्या नावाने बाजारात येणार आहे. जर असे झाले तर सॅमसंगच्या या फोनची नोकियाच्या एंड्रॉयड गो स्मार्टफोन नोकिया 1 शी सरळ टक्कर होईल. फोनचे   फीचर्सची गोष्ट केली तर यात एंड्रॉयड गो सोबत 1 जीबी रॅम, 1.43 गीगाहर्ट्जचा एक्सीनॉस 7570चे  प्रोसेसर देण्यात आले आहे. या अगोदर नोकिया 1, लावा झेड 50 आणि मायक्रोमॅक्स भारत गो सारखे   एंड्रॉयड गो स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे.
 
जर काही रिपोर्टचे मानले तर सॅमसंगने SM-J260F मॉडलची टेस्टिंग, ब्रिटन, जर्मनी, इटली, रशिया,  युक्रेन, फ्रांस आणि पॉलेंड सारख्या देशांमध्ये पूर्ण झालेली आहे. तसेच मॉडल नंबर SM-J260Mची   टेस्टिंग अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, पेरू सारख्या देशांमध्ये करण्यात येत आहे. वृत्तानुसार सॅमसंग आपले नवीन एंड्रॉयड गो फोनची टेस्टिंग भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत करत आहे.