शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

का फाटतो स्मार्टफोन... हे 5 कारण जाणून घेणे आवश्यक

स्मार्टफोन फाटण्याच्या बातम्या अलीकडे घडत असतात परंतू हे फार धोकादायक आहे. याने फोनलाच नव्हे तर आपल्यालाही मोठं नुकसान होऊ शकतं. याच्या दुष्परिणामापासून बचावासाठी आपल्या माहीत असले पाहिजे हे 5 कारणं-
 
1 सर्वात सामान्य कारणं म्हणजे बॅटरी अती तापणे. तासंतास फोन चार्जिंगला लावून सोडल्याने किंवा चार्जिंगवर फोन असताना फोन वापरणे अधिक गरम होण्याचे कारण आहे. अश्या परिस्थितीत बॅटरी विरघळू शकते.
 
2 चुकीचे चार्जर वापरल्याने फोन व बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. हे धोकादायक आहे.
 
3 स्वस्त बॅटरी वापर असल्यास बॅटरी लवकर गरम होणे किंवा फुगण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत देखील फोन ब्लास्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त चार्जिंग सर्किट आणि इनपुट पावर मध्येही फॉल्ट एक कारण असू शकतं.
 
4 जर आपण स्मार्ट विंडो वर काम करत असाल तर फोनच्या बॅटरीवर अधिक दबाव पडतो. यावर सावध राहण्याची गरज आहे.
 
5 स्मार्टफोनची बॅटरी लिथियम आयनने निर्मित असल्यामुळे हलकी असते. उंचीवरून पडल्यावर शॉर्ट सर्किटचा धोका असतो. अश्या परिस्थितीत बॅटरी किंवा फोन फाटण्याची शक्यता अधिक असते.