गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (15:37 IST)

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. याची किंमत मुळ iPhone X च्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी अॅपलनं स्पेस ग्रे आणि व्हाईट अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन बाजारात दाखल केला होता. याच आयफोनला रशियन कंपनीनं वेगळ्या रुपात बाजारात आणलं आहे. २४ कॅरेट सोनं वापरून तयार केलेला हा फोन क्लासिक गोल्ड आणि क्लासिक लिक्वेड गोल्ड अशा दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. ज्याची बाजारात किंमत साधरण मुळ किंमतीपेक्षाही दुप्पट आहे. हा फोन विकत घायचा झालाच तर भारतीय मुल्याप्रमाणे या फोनसाठी साधरण पावणे तीन ते सव्वा तीन लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. क्लासिक गोल्ड iPhone X ची किंमत साधरण २ लाख ९३ हजार आहे तर क्लासिक लिक्वेड गोल्डची किंमत ३ लाख १२ हजारांहून अधिक आहे.