गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

स्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन

जर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने भारतात आपले गॅलक्सी C7 प्रो ची किमतीत कपात केली आहे. हा फोन सॅमसंगने मागील वर्षी एप्रिलमध्ये लाँच केला होता, ज्याची किंमत 27,990 रुपये होती.
 
कंपनी यापूर्वी या फोनची किंमत कमी करून चुकली आणि आता पुन्हा सॅमसंग गॅलक्सी C7 प्रो (Samsung Galaxy C7 Pro) याची किंमत 2,500 रुपये आणखी कमी करण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यावर हा फोन 22,400 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. नवीन किंमत ऍमेझॉन इंडियावर लिस्ट केली गेली आहे.
 
सॅमसंगच्या वेबसाइटवर या फोनची किंमत अजूनही 24,900 रुपये दर्शवण्यात येत आहे. तसेच पेटीएम मॉलहून स्मार्टफोन खरेदीवर सॅमसंग 2,500 रुपयांचे पेटीएम मॉल कॅशबॅक देत आहे. पेटीएम मॉलने खरेदी केल्यावरही फोनची प्रभावी किंमत 22,400 रुपये असणार आहे.