मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

केळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात

सकाळच्या ब्रेकफॉस्टमध्ये केळी आणि गरम पाणी घेतल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणाही कमी होतो. योग्य मात्रेत याचे सेवन केल्याने शरीराला शेप मिळेल.
 
आपल्याला विश्वास बसत नसेल पण स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेटने भरपूर ही डायट आपला लठ्ठपणा कमी करण्यात मदत करेल. या नाश्त्याने पोट भरल्यासारखे वाटेल आणि आपण इतर कॅलरीज घेण्यापासून वाचाल. याव्यतिरिक्त आपल्या ऊर्जावान आणि शक्तिशाली वाटेल.
 
आतापर्यंत केलेल्या अनेक सर्व्हेमध्ये मॉर्निंग बनाना सेवन करण्याचे फायदे सांगितलेले आहेत. केळ शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढतो आणि पचनक्रिया सुधारतो. यात आढळणारे फायबर बद्धकोष्ठतेशी संबंधी तक्रार दूर करण्यात मदत करतं.
 
या ब्रेकफॉस्टनंतर आपल्याला ताजेतवाने वाटेल. यानंतर आपल्या अतिरिक्त शुगर किंवा कॅलरीज घेण्याची गरजही भासणार नाही.