शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (16:19 IST)

कोरोना रुग्णांमध्ये 'Brain fog'चा धोका, लक्षणे, कारणं आणि सावधगिरी

कोरोना संसर्गातून बरे झालेले रुग्णही इतर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत, त्यापैकी एक म्हणजे ब्रेन फॉग, म्हणजेच विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता प्रभावित होते. माणसाच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. एका प्रकारे मेंदू काम करत नाही. यात बहुतेक त्या रुग्णांचा समावेश आहे ज्यांचा बराच काळ रुग्णालयात उपचार करण्यात आला, ते ऑक्सिजन आणि औषधांवर होते.
 
यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकाराचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. एक संशोधनानुसार कोरोनापासून बरे झालेल्या सुमारे 28 टक्के लोकांनी ब्रेन फॉग, मूड बदलणे, थका आणि एकाग्रतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.
 
लक्षणे
ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड, नैराश्य, आवडीच्या कामातही रस नसणे, सतत डोकेदुखी, झोप न लागणे, छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे अशी लक्षणे दिसतात. रक्त तपासणीत डॉक्टर ते शोधू शकतात. जसे की साखर किंवा थायरॉईडचे असंतुलन, मूत्रपिंडाचे खराब कार्य इत्यादी, किंवा कोणत्याही संसर्गाची उपस्थिती किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता देखील ब्रेन फॉगच्या स्वरूपात दिसून येते.
 
ब्रेन फॉगचे कारणं
झोपेचा अभाव
स्क्रीनवर अधिक वेळ घालवणे
केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या समस्या, जसे की मल्टिपल स्क्लेरोसिस
ज्या आजारांमध्ये शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये सूज येण्याची शक्यता असते किंवा रक्तातील साखरेची पातळी वर -खाली जाण्यास सुरुवात होते, त्यामुळे ब्रेन फॉगची स्थिती देखील असू शकते. जसे की मधुमेह, हायपरथायरॉईड, नैराश्य, अल्झायमर आणि अॅनिमिया.
 
कर्करोग आणि केमोथेरपी
कर्करोगाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या केमोथेरपीमध्ये काही औषधे असतात, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तथापि, सहसा या समस्येचं स्वतःच निराकरण होते.
 
क्रॉनिक फटीग सिंड्रोम
अधिक थकवा सिंड्रोमची स्थिती 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकते. यामध्ये, व्यक्तीला मानसिक थकवा येतो, ज्यामुळे तो गोंधळलेला राहू लागतो.
 
औषधांचा प्रभाव
ठराविक औषधांच्या सेवनामुळे ब्रेन फॉग देखील येऊ शकते, उदासीनता किंवा निद्रानाश मध्ये दिलेली औषधे विचार आणि समजून घेण्यावर परिणाम करतात.
 
आहार आणि खबरदारी
तुमच्या आहारात अमिनो अॅसिड, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा नियमित समावेश करा.
दुपारी कॅफीनयुक्त पेय घेऊ नका.
मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
दररोज 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.
नियमित व्यायाम करा.
लक्षणांवर अवलंबून, तुम्ही एक्स -रे, सीटी स्कॅन, एमआरआय, अॅलर्जी चाचणी इत्यादीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
बर्‍याच प्रकरणांमध्ये, औषधांसह थेरपी देखील या समस्येचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.