बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : गुरूवार, 23 मार्च 2023 (17:11 IST)

मधुमेह आणि वंध्यत्व

diabetes
आजकाल मधुमेह हा आपल्या जीवनशैलीचा आजार झाला आहे. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित होते. पण याबरोबरच मधुमेहाचा आपल्या प्रजनन क्षमतेवर देखील प्रभाव पडतो. याबद्दल खूपच कमी लोकांना हे माहित असेल की, मधुमेह विशेषतः पुरुषांच्या आणि थोड्याफार प्रमाणात स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो. 
 
मधुमेहामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन सारख्या समस्या दिसून येतात. याचा परिणाम केवळ लैंगिक आरोग्यावर होत नाही, तर थेट प्रजननक्षमतेवरही होतो.
 
अशा प्रकारामध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे पुरुषांच्या वीर्यामध्ये डीएनए विखंडन पातळी अनियंत्रित होऊ शकते.
 
प्रकार १ चा मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी सामान्य गोष्ट झाली आहे. तर प्रकार २ च्या मधुमेहाने ग्रस्त महिलांना PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) आणि लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. मधुमेह असलेल्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात आणि मृत जन्मासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय नवजात बालकामध्ये गुंतागुंत आणि अतिरिक्त वजन होण्याची शक्यता असते.
 
नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैलीचे पथ्य आणि सकस आहाराचे सेवन करून तसेच तंबाखूसारख्या पदार्थांपासून दूर राहून तुम्ही आपले वजन नियंत्रित ठेवू शकतात. भविष्यात मधुमेहला प्रतिबंध करने महत्वाचे झाले आहे.
 
मधुमेह आणि गर्भधारणा
जीवनशैलीतील बदल आणि अन्य कारणांमुळे आज मधुमेहाचे निदान झालेल्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. गर्भधारणेदरम्यान GTT (Glucose Tolerance Test) द्वारे हे तपासले जाऊ शकते. ज्या स्त्रिया खूप लठ्ठ आहेत आणि ज्यांच्या घरी मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना मधुमेह असू शकतो. तसेच वारंवार लघवी होणे, थकवा येणे ही मधुमेहाची सामान्य लक्षणे असू शकतात.
 
यावर वेळीच नियंत्रण न केल्यास गर्भधारणा गुंतागुंतीची होऊ शकते. गर्भपात, अकाली जन्म, बाळाचे अतिरिक्त वजन आणि मृत जन्म, जन्म दोष यासारख्या समस्या असू शकतात. याशिवाय प्रकार २ च्या मधुमेहामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो.
 
प्रसूतीनंतर गर्भधारणेचा मधुमेह निघून तर जातो, पण भविष्यात अश्या महिलांना प्रकार २ चा मधुमेह होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नवजात बाळकांच्या मातांनी सकस आहार घेणे, हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. यासोबतच, तुमच्या रक्तातील साखरेची पातळीचे निरीक्षण करणे, आणि गर्भधारणेदरम्यान बाळाच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Dr Hrishikesh Pai