सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (18:42 IST)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मध्ये मुलांची काळजी अशी घ्या -तज्ञांचा सल्ला

कोरोना विषाणूची ही दुसरी लाट इतकी भयानक असेल याची कोणीच कल्पनाही केली नव्हती.कोविडच्या पहिल्या लाटेमधे वृध्दांना धोका असून ते या आजाराला बळी गेले होते.आता कोरोनाविषाणुंच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्ग बळी गेला आहे. त्याच बरोबर आता कोरोना विषाणुची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तली जात आहे. 
तज्ञांच्या मते या कोरोनाची ही तिसरी लाट 18 वर्ष पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी धोकादायक आहे. तर कोविड पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. आता 18 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरण करण्यासाठी देखील चर्चा सुरु आहे. परंतु  कोविड ची ही लस मुलांसाठी कितपत सुरक्षित आहे?    
 
वेबदुनिया यांनी एमजीएम मेडिकल कॉलेजचे माजी डीन आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद थोरा यांच्याशी चर्चा केली, चला तर मग ते काय म्हणाले जाणून घेऊ या.
डॉ. शरद थोरा म्हणाले, कोविडच्या पहिल्या लाटेत दररोज सुमारे 1 लाख प्रकरणे आली. दुसर्‍या लाटेत दररोज 4 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसेच, याचे इतर व्हेरियंट देखील वाढले आहे.  यामुळे अधिक गंभीर प्रकरणे झाले आहे. याचे वेगवेगळे व्हेरियंट अधिक जास्त प्रभावी आहेत, जो लोकांना अधिक जलदगतीने  आणि अधिक संक्रमित करत आहे. तसेच बरेच अल्पसंख्याकांना लसीकरण झाले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होण्याची मोठी करणे म्हणजे संक्रमणाचा प्रसार झपाट्याने होणे आणि तीव्रतेचे प्रमाण अधिक होणे.
 
मुलांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्यांना त्रास कमी होतो. म्हणून मुलांमध्ये कोविड सारखे गंभीर आजार होत नाही. 
14 वर्षांखालील मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते.
दुसर्‍या लाटेत संसर्ग वेगाने पसरला.गंभीररीत्या प्रकरणे वाढले. म्हणून लोक जास्त प्रमाणात प्रभावित झाले.
 
देशातील सुमारे 25 टक्के मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. मुलांना लस दिली गेली नाही. अशा परिस्थितीत मुलेही या आजाराला  बळी पडू शकतात. दुसऱ्या लाटेत, कोविड पॉझिटिव्ह झालेल्या  लोकांची प्रतिकारशक्ती वाढेल. उदाहरणार्थ, ज्यांना पहिल्या लाटेमध्ये कोविडची लागण झाली त्यांचा वर दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम झाला नाही.
 
तिसऱ्या लाटेत  एक शक्यता अशी आहे की मुलांना कोविडची लागण होऊ शकते आणि त्याची तीव्रता देखील जास्त असू शकते. दुसरी शक्यता अशी आहे की जूनपर्यंत ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे आणि असे झाले तर कोविड विषाणूने बाधित रुग्णांची ही संख्या पूर्वीपेक्षा कमी असू शकते.
 
मुलांची दोन प्रकारे काळजी घ्या-
 
मुलांची काळजी घेण्यासाठी दोन गोष्टी आहेत.मुलांमध्ये हा आजार सौम्य पातळीवर होतो. बहुतेक स्तरावर मुले या आजारात बरी होतात. 97 टक्के मुलं बरे होतात. कोविड प्रोटोकॉल ने. मुले हे सुपर स्प्रेडर असतात. घरातील ज्येष्ठांना मधुमेह,उच्च रक्तदाब, सारखे काही आजार आहे तर त्यांना कोविड ची लागण  लागू  शकते .कारण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असते.म्हणून मुलांपासून यांना लांब ठेवतात. मुलांना संसर्ग कमी होतो, तेव्हा मुलांना 14 दिवस घरी एकटे ठेवावे लागते. यावेळी त्यांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मुलांना डॉ. पर्यवेक्षणामध्ये ठेवा. 
यावेळी, त्यांचे भावनिक समर्थन खूप महत्वाचे आहे. त्यांचे छंद काय आहे ते त्यांना करू द्या.
 
रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची-
 
मुलांना अंकुरलेले मूग, हरभरा, हिरव्या भाज्या आणि फळ जेवणामध्ये खायला द्या. या सर्वांमध्ये मुलांना जीवनसत्त्वे मिळू शकतात. यासह मुलांना व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि झिंकच्या गोळ्या देखील देऊ शकता. 5 वर्षांपेक्षा मोठा मुलगा गोळी घेऊ शकतो आणि 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सिरप देऊ  शकता.
 
कोविड लस मुलांसाठी सुरक्षित आहे का?
 
काही दिवसांत, कोविड चाचणी 2 वर्ष ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये सुरू होणार आहे. भारतात, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना लस दिली जात नाही. यूएस मध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ही लस वैध आहे. भारतात संशोधन व चाचण्या सुरू आहेत. हे मंजूर झाल्यावर मुलांना लसीकरण द्यायला हवे . हा या जीवघेण्या आजारापासून स्वतःला आणि इतरांना संरक्षित ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.