बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (08:05 IST)

दररोज किती अंडी खायची?

अंडी हा पोषक असा आहार. एका अंड्यात प्रथिने, बी 12 जीवनसत्त्व, कॅल्शियम तसेच अँटिऑक्सिडंट्‌स असतात. अंडे कितीही पोषक असले तरी त्याच्या बलकात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. त्यातच अंड्यांच्या अतिरेकामुळे पोटाशी संबंधित त्रास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अंडी प्रमाणातच खायला हवीत.
 
एका अंड्याच्या बलकात साधारणपणे 200 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. माणसाने दिवसभरात 300 मिलिग्रॅमपेक्षा अधिक कोलेस्टेरॉलचे सेवन करू ने. मात्र, कोलेस्टेरॉलच्या वाढीत आहारातल्या कोलेस्टरॉलची फारशी भूमिका नसते, असे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. प्रत्यक्षात सॅच्युरेटेड फॅट्‌सुळे वाईट कोलेस्टरॉल वाढते.
 
निरोगी व्यक्तीने दिवसभरात किती अंडी खावीत याबाबत ठामपणे काहीच सांगता येत नाही. हा आकडा व्यक्तीगणिक बदलू शकतो. एका अभ्यासानुसार निरोगी व्यक्ती आठवड्याला सात अंडी खाऊ शकते. कोणताही आजार नसणारे तसेच अंड्यांमुळे कोणताही दुष्परिणाम होत नसल्यास दिवसभरात तीन अंडी खाता येतील.
अभय अरविंद