बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (09:00 IST)

ब्लॅक फंगस आजारापासून वाचण्याचे उपाय जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर रूग्णांमध्ये एक नवीन आजार उद्भवत आहे. ज्याला म्यूकोर मायकोसिस म्हणतात. सामान्य भाषेत, याला ब्लॅक फंगस असे म्हटले जाते. ब्लॅक फंगस नावाचा हा रोग मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जास्त आढळतो. या आजाराचे मुख्य कारण जे समोर येत आहे ते म्हणजे स्टिरॉइड्सचा जास्त वापर. स्टिरॉइड ही  औषध देण्याची एक वेगळी पद्धत आहे, ती फक्त डॉक्टरांच्या देखरेखी खालीच घ्यावी.
 
कोविड रूग्ण स्टिरॉइड औषधाने बरे होतात, परंतु ते बरे झाल्यावर ब्लॅक फंगस या आजाराच्या विळख्यात येत आहे. या आजारापासून वाचण्यासाठी बरीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला तर मग ब्लॅक फंगस पासून वाचण्याचे काही उपाय जाणून  घेऊ या.  
 
1 सर्जिकल मास्कचा वापर करणे म्हणजे वापरणे आणि फेकणे. युज अँड थ्रो ,म्हणजे ते वापरुन फेकून द्या. दुसरीकडे, जर हे कपड्यांच्या मास्क बद्दल बोलायचे झाले तर केवळ ते सेनेटाईझ करुन ठेवू नका, तर मास्क आपल्या कपड्यांसह धुवा आणि उन्हात वाळवा.
 
2 एन 95 मास्क चा वापर केवळ मर्यादित काळासाठी करा. याला देखील वापरून झाल्यावर साबणाने स्वच्छ धुवून ठेवा. 
 
3 बऱ्याच वेळा आपण भाज्यांवर लागलेली बुरशी बघतो. पाण्याने धुतल्यावर ती स्वच्छ देखील होते परंतु त्याचे काही कण चिटकून राहतात. म्हणून काही भाज्या जसे की ब्रोकोली, कांदा, पानकोबी, ढेमसे,टोमॅटो या भाज्या तुरटीच्या पाण्यात किंवा व्हिनेगरच्या पाण्यातून धुवून काढा.
 
4  बर्‍याच वेळा आपले लक्ष जात नाही, परंतु फ्रिजच्या दारावर, पाण्याच्या साठ्यातही फंगस लागते.फंगस किंवा बुरशी दिसल्यावर त्वरितच त्याला डेटॉलने स्वच्छ करा.
 
5  कोरोना रूग्ण नवीन मास्क किंवा रोजचा मास्क धुवून वापरतात. हे देखील लक्षात ठेवा, की सिलेंडर किंवा कोसंट्रेटरमध्ये स्टेराईल पाणी/सलाईन घाला आणि दररोज त्यात बदल करा. 
 
6  कोविडातून बरे झाल्यावर, रुग्णाची घरीही अशीच काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड पोस्टच्या रुग्णांच्या जवळपास ओलावा नसावा. लक्षात ठेवा की आपला आसपासचा परिसर पूर्णपणे कोरडा ठेवा आणि स्वच्छतेची काळजी घ्या. आपण आपले कपडे डेटॉल मध्ये देखील धुवू शकता. 
या ब्लॅक फंगस आजारावर उपचार करणे सामान्य माणसासाठी देखील महाग असते. म्हणूनच, स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी आणि लोकांनाही जागरूक करावे.