सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (16:52 IST)

मानसिक आरोग्यः डोक्यात हे छोटं मशीन बसवून नैराश्यावर उपचार होऊ शकतो?

डोक्याच्या आतमध्ये काड्यापेटीच्या आकाराचे एक इलेक्ट्रिक यंत्र बसवून नैराश्यासारख्य़ा गंभीर आजारावर उपचार केला जाऊ शकतो असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. एका रुग्णावर या उपचार प्रक्रियेचा प्रयोग करण्यात आल्यानंतर सकारात्मक बदल दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
36 वर्षांच्या सारा यांनी साधारण वर्षभरापूर्वी हे यंत्र आपल्या डोक्यात बसवून घेतलं. यानंतर आपलं आयुष्यच बदललं असं त्या सांगतात.
 
सारा यांच्या डोक्यात बसवलेलं हे यंत्र नेहमी 'चालू' असतं आणि मस्तिष्क या यंत्राचा वापर तेव्हाच करतं जेव्हा त्याला याची गरज भासते.
 
या यंत्राचा उपयोग साराप्रमाणेच इतर गंभीर आजारांवर मात करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो असं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही असं सॅन फ्रांसिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केलं.
 
असं असलं तरी यात यश मिळेल असा विश्वास त्यांना आहे. यासाठी ते आणखी काही चाचण्यांचे नियोजन करत आहेत.
 
डिप्रेशन सर्किट
डिप्रेशनसाठी हा प्रायोगिक उपचार मिळवणारी सारा पहिलीच रुग्ण आहे. गेल्या काही वर्षांत साराने घेतेलेले अनेक उपचार निरुपयोगी ठरले. डिप्रेशनवरील कमी करण्याची औषधं आणि इलेक्ट्रोकोनवल्सिव थेरेपीचाही त्यांना काहीच उपयोग झाला नाही.
 
सारा सांगतात, "ही शस्त्रक्रिया करणं कठीण वाटू शकतं. पण मी काळोखाचा सामना करत होते त्यावर मला कोणत्याही परिस्थितीत दिलासा हवा होता. त्यामुळे हा उपाय एक चांगला पर्याय होता. यापूर्वी मी अनेक प्रकारचे उपचार केले."
 
"मला दैनंदिन जीवनात अनेक मर्यादा होत्या. मला रोज त्रास होत होता. एका जागेवरुन हलण्यासाठीही मला प्रयत्न करावे लागत होते,"असंही त्या म्हणाल्या.
 
या सर्जरीसाठी त्यांच्या डोक्यात काही छोटे छिद्र करण्यात आले. यात काही तारा बसवण्यात आल्या. यामुळे त्यांच्या बुद्धीची देखरेख केली जात होती आणि वेळोवेळी त्याला उत्तेजित केलं जात होतं.
 
बॅटरी आणि पल्स जनरेटरच्या बॉक्सला त्यांची कवटी आणि केसांच्या खालील हाडांमध्ये फीट करण्यात आलं. यासाठी एका दिवसाचा कालावधी लागला. तोपर्यंत सारा बेशुद्ध होत्या. त्या सांगतात, जेव्हा त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना उत्साह वाटला.
 
"इंप्लांट केल्यानंतर माझं आयुष्य चांगलं होऊ लागलं. मी पुन्हा सुखी झाले. काही आठवड्यात आत्महत्येचे विचार नाहीसे झाले. मी डिप्रेशनमध्ये असताना केवळ वाईट गोष्टी पाहिल्या." असंही त्यांनी सांगितलं.
 
या सर्जरीसाठी त्यांच्या डोक्यात काही छोटे छिद्र करण्यात आले. यात काही तारा बसवण्यात आल्या. यामुळे त्यांच्या बुद्धीची देखरेख केली जात होती आणि वेळोवेळी त्याला उत्तेजित केलं जात होतं.
बॅटरी आणि पल्स जनरेटरच्या बॉक्सला त्यांची कवटी आणि केसांच्या खालील हाडांमध्ये फीट करण्यात आलं. यासाठी एका दिवसाचा कालावधी लागला. तोपर्यंत सारा बेशुद्ध होत्या. त्या सांगतात, जेव्हा त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना उत्साह वाटला.
 
"इंप्लांट केल्यानंतर माझं आयुष्य चांगलं होऊ लागलं. मी पुन्हा सुखी झाले. काही आठवड्यात आत्महत्येचे विचार नाहीसे झाले. मी डिप्रेशनमध्ये असताना केवळ वाईट गोष्टी पाहिल्या." असंही त्यांनी सांगितलं.
 
शस्त्रक्रिया झाल्यावर वर्षभरानंतर सारा आता स्वस्थ आहेत. "या यंत्राने मला डिप्रेशनपासून दूर ठेवलं. आयुष्य पुन्हा बदलण्यासाठी मला मदत मिळाली."
 
यंत्र सुरु असल्याची जाणीव त्यांना होत नाही. "मी सांगू शकते की सतर्कता, ऊर्जेचा अनुभव आणि सकारात्मक वाटू लागल्यानंतर 15 मिनिटांत हे यंत्र बंद होतं."
 
यंत्र कसं काम करतं?
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मानसोपचार तज्ज्ञ आणि संशोधक डॉ.कॅथरीन स्कैनगोस यांनी सांगितलं की, साराच्या मस्तिष्कात 'डिप्रेशन सर्किट'बाबत कळाल्याने हे संशोधन शक्य होऊ शकलं.
 
त्या म्हणाल्या, "आम्हाला वेंट्रल स्ट्रिएटम नावाच्या एका भागाची माहिती मिळाली जिथे उत्साहाचे संकेत मिळाल्याने त्यांच्यातील डिप्रेशनच्या भावना संपल्या. आम्हाला आणखी एका भागाची माहिती मिळाली जिथल्या हालचालींमुळे हे कळू शकतं की त्यांच्यातील लक्षणं कधी सर्वाधिक गंभीर होती."
 
डिप्रेशनचे याहून गंभीर रुग्ण बरे होण्यासाठी आणि या उपचार पद्धतीचा आणखी खोलवर तपास करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
 
'अजून मोठा पल्ला गाठायचा आहे'
डॉ. स्कैनगोस यांनी या उपचाराच्या ट्रायलसाठी आणखी दोन रुग्ण दाखल करुन घेतले आहेत आणि आणखी 9 रुग्णांना भरती करण्याची त्यांची इच्छा आहे.
 
त्या सांगतात, "डिप्रेशनचे हे सर्किट प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळे असतात याबाबत माहिती करुन घेण्याची गरज आहे. हे काम पुन्हा पुन्हा करावं लागतं."
 
"उपचार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे बायोमार्कर किंवा ब्रेन सर्किट वेळेनुसार बदलतात की नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे." असंही त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे सांगतात, "आम्हाला कल्पना नव्हती की आम्ही नैराश्यावर उपचार करू शकू. कारण ही केस अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्यांना बरं होताना पाहत असताना आम्हीही उत्साहीत आहोत. अशा रुग्णांसाठी या उपचाराची गरज आहे."
हे यंत्र बसवणारे न्यूरोसर्जन डॉ.एडवर्ड चांग सांगतात, "ही पद्धत किती प्रभावी आहे हे याबाबत सांगत नाही हे मी स्पष्ट करतो. प्रत्यक्षात या कामाचा हा पहिलाच प्रयोग आहे. या पद्धतीला मान्यता मिळवण्यासाठी आणखी बरच काम करावं लागणार आहे."
 
ब्रिटन विद्यापीठाचे कॉलेज लंडनचे न्यूरोसायंटिस्ट प्राध्यपक जोनाथन रोयजर यांनी सांगितलं,
 
"हा उपचार केवळ गंभीर रुग्णांवरच केला जाऊ शकतो. इतर रुग्णांवर या उपचाराचे ट्रायल केल्यास वेगळ्या भागांची माहिती घेण्याची गरज आहे. कारण प्रत्येक रुग्णांची लक्षणं वेगवेगळी असतात."
 
ते पुढे सांगतात, "या प्रकरणात एकच रुग्ण होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये आशावादी परिणाम दिसतात की नाही हे नंतरच कळू शकेल."