मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:55 IST)

अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा

अश्वगंधाला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान दिले आहे, ही एक चमत्कारिक औषधी वनस्पती आहे जे बऱ्याच रोगांवर उपचार करण्यात प्रभावी मानली आहे. चला तर मग अश्वगंधांचे चमत्कारिक गुणधर्म जाणून घेऊ या.
  
1 अश्वगंधा चमत्कारिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात ह्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ह्याच्या मुळा आणि पानांपासून औषधे बनवतात. 
 
2 तणाव, काळजी, थकवा, झोपेची कमतरता सारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचा उपचार अश्वगन्धाने करतात.हे तणाव देणारे कॉर्टिसॉल ची पातळी कमी करण्यात उपयुक्त आहे. 
 
3 जर एखादा नैराश्याने वेढलेला आहे तर त्यावर उपचार करणे अश्वगंधाने शक्य आहे.
 
4 या मध्ये अँटी इंफ्लामेंट्री आणि अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असतात जे संसर्गापासून वाचवतात. तसेच हे हृदयाला निरोगी ठेवण्यात देखील मदत करतात. 
 
5 अश्वगंधा कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार हे केमोथेरपीने होणारे दुष्परिणाम कमी करतात.
 
6 असे मानले जाते की ह्याचे मूळ वाटून जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून निघते.  या व्यतिरिक्त हे रोग प्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. 
 
7 असे मानले जाते की त्वचेच्या रोगाला दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचे आजार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 
 
टीप : जर आपले औषधे सुरू आहेत किंवा गरोदर असाल, तर डॉक्टरांच्या सल्ला घेतल्या शिवाय ह्याचे सेवन करू नये.