testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चमचाभर साखर कमी करू शकते वृद्धांची विस्मृतीची समस्या

Last Modified रविवार, 5 ऑगस्ट 2018 (00:59 IST)
म्हातारपणी जे लोक कमजोर स्मृतीची शिकार ठरतात व छोट्यामोठ्या गोष्टी विसरतात, त्यांच्यासाठी एक चमचा साखर लाभदायकठरू शकते, असा खुलासा एका ताज्या अध्ययनातून झाला आहे. त्यामुळे त्यांची स्मृती वाढू शकते. ज्यावेळी आपल्या पाण्यामध्ये थोडी साखर मिसळून पितो, तेव्हा आपला मेंदू आधीच्या तुलनेत जास्त कठोर मेहनत करू लागतो. एवढेच नाही तर वृद्ध लोक साखरेचे सेवन केल्यानंतर स्वतःला जास्त खूश समजतात व त्यांची स्मृतीही चांगली होते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, समजा आपल्या शरीरात मेंदूसाठी जास्त ऊर्जा उपलब्ध झाली तर आपल्याला जास्त मेहनत घेण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आपला आत्मविश्र्वास अधिक चांगला होईल व आपले मानसिक प्रदर्शनही उत्तम होईल. युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या दाव्यानुसार, या अध्ययनाचे निष्कर्ष जे वृद्ध आपल्या मेंदूचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांच्यासाठी कमी लाभदायक ठरू शकतात. साखरेचे थोडेसे प्रमाण 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मूड चांगला करून स्मृती सुधारण्यास मदत करतो. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी काही वृद्धांना साखरमिश्रीत पेय पिण्यासाठी दिले व त्यानंतर त्यांना बौद्धिक काम दिले. हे पेय पिणार्‍या वृद्धांची स्मृती सुधारली व त्यांचा मूडही चांगला झाला. यामुळे त्यांची एकाग्रताही वाढल्याचे दिसून आले.


यावर अधिक वाचा :

विदर्भ : उमरखेड तालूका पक्षी म्हणून “सुगरण”पक्ष्याची निवड

national news
उमरखेड तालूक्यातील जनतेला पक्षी जीवनाची ओळख व्हावी, पक्ष्यांबद्दल ओढ लागावी,तालूक्याची ...

लातूर वर पुन्हा जलसंकट, एन पावसाळ्यात धरणात फक्त ८ टक्के ...

national news
लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के ...

३१ देश ६०० सायकलवरून भ्रमण, जगात माणुसकी हा सर्वात मोठा ...

national news
विश्वातील ३१ देश ६०० दिवसात २४००० किमी सायकलवरून भ्रमण करतांना सर्व देशांतील सामान्यजनात ...

आमच्यासाठी गरीबांच्या घराची चूल महत्त्वाची - जयंत पाटील

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट ...

भांडी घासणारा अफलातून रोबो

national news
धुणे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आल्यावर अनेक गृहिणींना दिलासा मिळाला होता. मात्र, भांडी ...