testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'सेक्स लाईफ' फुलवण्यासाठी 'हिप्नोथेरेपी'

sex life
लंडन| वेबदुनिया|
तुमचं सेक्स लाईफ नीरस झालंय का? अपेक्षित 'मजा' येत नाहीये का? मग 'हिप्नोसिस' एकदा करून घ्याच. तुमच्या प्रणयभावना पु्न्हा जागतील. मग तुमचं सेक्स लाईफ पुन्हा एकदा रोमॅंटिक होऊन फुलेल.
हजारो ब्रिटनवासियांनी या प्रक्रियेतून जात 'सेक्स लाईफमधील गमावलेला आनंद मिळवला आहे. या थेरेपीने अनेकांचं 'सेक्स लाईफ' एका रात्रीत बदलल्याचं वृत्त डेली स्टारने दिलं आहे.

सेक्स लाईफ थंडावलं असेल. त्यात 'ती' उत्कटता आता राहिली नसेल. तर 'हिप्नोटिस्ट' ती विझलेली 'आग' पुन्हा जागवते. अनेकदा दीर्घ कालावधीनंतर परस्पर संबंधांमध्ये जोडीदाराविषयीच्या नको त्या गोष्टी 'हायलाईट' होतात आणि त्याच्या आवडत्या गोष्टी नजरेआड होतात. त्याचाच परिणाम 'सेक्स लाईफ'वर पडतो.

नेमक्या याच चुका 'हिप्नोटिस्ट' थेरेपीतून दुरूस्त केल्या जातात. जोडीदाराच्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रसन्न वाटत होतं, त्याच्या कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या प्रणयभावना चेतत होत्या. त्या तुमच्यासमोर आणून तुमच्यातल्या 'त्या' भावना या थेरेपीद्वारे जागृत केल्या जातात. तुम्ही पहिल्यांदा भेटले तेव्हा वाजत असलेलं गाणं, एखादा जुना फोटो, एखादा सुगंध हरवलेल्या 'त्या' भावना जागृत करते.

या सगळ्यातून नक्कीच चमत्कार घडतात. तुटायपर्यंत आलेली लग्न वाचतात', असे हिप्नोथेरेपीस्ट पीटर सॅलिसबरी यांचं म्हणणं आहे. या थेरेपीमुळे 'बेडरूम परफॉर्मन्स' नक्कीच सुधारतो. शिवाय जोडीदारांमध्ये परस्पर संबंध दृढ करायलाही मदत करते, असेही ते म्हणतात.


यावर अधिक वाचा :

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...