Widgets Magazine
Widgets Magazine

भोजनाचा गंध वाढवू शकतो लठ्ठपणा

अतिखादाडपणामुळे शरीराचे वजन वाढते, हे सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र अन्न खाल्ल्यामुळेच वजन वाढते, असे नाही तर त्याचा सुगंधसुद्धा तुमच्या आरोग्यावर भारी ठरू शकतो. चांगल्या खाद्यपदार्थांचा दरवळही व्यक्तीची भूक वाढवतो. हा दरवळ लठ्ठपणाचे कारण बनू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. अमेरिकेतील लॉस एंजेल्समधील सेडर्स सिनाई मेडिक सेंटरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, समजा एखाद्या उंदराची हुंगण्याची क्षमता नष्ट केली तर जास्त भोजनही त्याच्या लठ्ठपणासाठी कारण ठरत नाही.
 
दुसरीकडे ज्या उंदरांची हुंगण्याची क्षमता जास्त होते, त्यांचे वजन दुप्पट वेगाने वाढते. या संशोधनात असे दिसून आले की आपण जे खातो, त्याच्या सुंगधाचा आपल्या प्रकृतीवर मोठा परिणाम होतो. या सुगंधशतूनच भोजनातून मिळणार्‍या कॅलरीचा आपले शरीर कसा वापर करेल, हे ठरत असते.
 
या संशोधनाचे प्रमुख सेलीन रोएरा यांनी सांगितले की समजा आण हुंगण्याची क्षमता बदलली तर भोजनातून मिळणार्‍या ऊर्जेप्रती शरीराचे वर्तनही बदलते. संवेदना प्रणाली आपल्या चयापचय प्रक्रियेवर मोठा प्रभाव टाकते. वजन केवळ आपण किती कॅलरी घेतल्या यावर निर्भर नसते, तर शरीराने त्या कॅलरींचा कशाप्रकारे वापर केला यावरही अवलंबून असते. वजनवाढीसाठी कारणीभूत ठरणारीही संपूर्ण प्रक्रिया समजून हेतु हुंगण्याच्या क्षमतेला प्रभावित न करता त्यावर नियंत्रण करता येऊ शकणारी औषधे बनविणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञशंनी सांगितेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

युरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा!

गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचे समजावे. घरगुती ...

news

स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त झोपायला हवे

निरोगी आरोग्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. दिवसभराच्या थकव्यानंतरची शांत झोप तुम्हाला फ्रेश ...

news

मध आणि लवंगांसोबत खाण्याचे फायदे

याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो.

news

हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करणार प्रोटीन

हृदयविकार आणि स्ट्रोकपासून बचाव करणाच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ...

Widgets Magazine