शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

अधिक मांसाहार मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या कारण

आपणं नॉनव्हेज खाण्याचे शौकिन असाल तर सावध व्हा. शोधकर्त्यांप्रमाणे अधिक मास खाल्ल्याने मृत्यू होऊ शकते. यावर ताकीद देत शोधकर्त्यांनी म्हटले आहे की रेड मीट सेवन करणार्‍यांना मृत्यूचा धोका अधिक असतो. 
 
शोधाप्रमाणे रेड मीटऐवजी मासे, अंडी, खडं धान्य, आणि भाज्या खाणारे अधिक काळ जगतात. या शोधात रेड मीट खाणारे आणि वयापूर्वी मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये संबंध शोधलं गेलं आहे.
 
शोधकर्त्यांनी आठ वर्ष रेड मीट सेवन करणारे आणि पुढील आठ वर्षात मृत्यू दर यावर स्टडी केली आणि या परिणामावर आले की रेड मीटचे सेवन केल्याने मृत्यूचा धोका अधिक असतो. यासाठी आरोग्य व्यवसायाशी जुळलेल्या सुमारे पन्नास हजार लोकांचा डेटा गोळा करण्यात आला होता.
 
डेटात सामील लोकांना कर्करोग आणि हृद्यासंबंधी कुठलंच आजार नव्हतं. यात त्यांच्या आहारावर लक्ष दिले गेले. यावरून निष्कर्ष निघाला की मासे, अंडी, धान्य आणि भाज्या खाल्ल्याने व्यक्ती अधिक काळ स्वस्थ राहू शकतो आणि रेड मीट खाल्ल्याने मृत्यूचा धोका नाकारता येत नाही.