शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (17:59 IST)

लॅपटॉप वर काम करताना खांद्याची अशी काळजी घ्या

सध्या कोरोनामुळे लोक घरातूनच काम करत आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉपआणि कॉम्प्युटर वर काम करून थकवा जाणवतो आणि पाठीत आणि खांद्यात वेदना होणं या सारख्या समस्या उद्भवतात. आपण देखील या समस्येने वेढले आहात तर काही व्यायाम सांगत आहोत ज्यांना अवलंबवून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 
खांद्या आणि पाठीत वेदना असल्यावर कोणते व्यायाम करायला पाहिजे हे सांगत आहे डॉ.चंद्रशेखर विश्वकर्मा ,हे फिजिओथेरपिस्ट आणि योग प्रशिक्षक आहे.

डॉ.चंद्रशेखर विश्वकर्मा 
सर्वप्रथम दोन्ही हात डोक्याच्या मागे नेत वर ताणून धरायचे आहे. 
दोन्ही हाताचे कोपरे दुमडून बोटांना खांद्यावर ठेवा आणि खांद्यांना घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा. 
 
*दोन्ही खांद्यांना वर आणि खाली आणि मागे आणि पुढेकरा -
डोकं डावी -उजवी कडे वाकवायचे आणि गोल फिरवायचे आहे.
 
आता पाठ दुखी साठी चे व्यायाम जाणून घ्या -
बसून किंवा उभे राहून दोन्ही हाताचे बोटाना क्रॉस करून धरायचे, नंतर दोन्ही हातांना सरळ खांद्याच्या पातळीवर आणा आणि त्याच वेळी डोकं खाली वाकवा. असं केल्याने पाठीत तणाव जाणवतो. 
उशीवर डोकं ठेवून दोन्ही हाताची बोट क्रॉस करा दोन्ही हात सरळ उभे करा.
दोन्ही पाय अंतरावर ठेवा आता हाताला दुमडून न घेता दोन्ही बाजूला आळी-पाळीने आपल्या शरीराचा वरील भाग वळवा .
टीप-लक्षात ठेवा की मनगट आणि कोपरे दुमडायचे नाही.