शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 18 जानेवारी 2021 (15:54 IST)

तुम्हीपण रात्री पोटावर झोपता....

रात्री आपण नकळत अशा अनेक चुका करतो, ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यातील एक चूक म्हणजे रात्री पोटावर झोपणे. बर्यारच लोकांना हे माहीत नाही की, पोटावर झोपल्याने आपल्या आरोग्यास बर्याजच प्रकारे नुकसान होते. पोटावर झोपण्याने शरीराचे रक्ताभिसरण चांगले होत नाही.
 
तसेच शरीराचा नैसर्गिक आकार खराब होऊ लागतो, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजीशियन डॉ. मनीष जैन यांच्या म्हणण्यानुसार, पोटावर झोपल्यामुळे बरेच नुकसान होते. या लेखात, आज आम्ही आपल्याला पोटावर झोपण्याचे तोटे सांगणार आहोत. चला तर मग पोटावर झोपण्याचे 6 तोट्यांविषयी जाणून घेऊ या.
 
बर्यालच लोकांना हे माहीत नाही की, पोटावर झोपल्याने मान दुखण्याची समस्या वाढू शकते. पोटावर झोपल्याने मान एका साईडला फिरते. अशा प्रकारच्या झोपण्यामुळे मानेचे स्नायू ताणले जातात आणि रक्त परिसंचरण व्यवस्थित होत नाही. यामुळे त्या व्यक्तीला मान दुखण्याची समस्या सस उद्‌भवते. जर आपण सकाळी उठल्यावर मानेला वेदना होऊ लागल्या तर आपण आपली झोपेचीपद्धत बदला.
 
पोटावर झोपण्यामुळे पाठदुखीचा त्रासदेखील होतो. पोटावर झोपण्यामुळे, आपल्या पाठीचे स्नायू त्याचा नैसर्गिक आकार गमावते. जेव्हा मेरुदंड आपला आकार गमावतो, तेव्हा पाठदुखीची समस्या सुरू होते. तर जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्यामागील एक कारण म्हणजे आपल्या पोटावर झोपणे होय.
 
पोटावर झोपण्यामुळे उद्‌भवणारी आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे डोकेदुखी. जर आपण आपल्या पोटावर झोपालात तर आपली मान फिरली जाईल आणि रक्त परिसंचरण योग्यप्रकारे होणार नाही. जर रक्त परिसंचरण योग्यप्रकारे झाले नाही तर डोकेदुखीची समस्या असणे सामान्य आहे. म्हणूनच, आपण डोकेदुखीच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि आपल्याला पोटावर झोपायची सवय असेल तर हे मुख्य कारण असू शकते.

जर आपण पोटावर झोपलात तर खाल्लेले अन्न योग्यप्रकारे पचन होणार नाही. जर अन्नव्यवस्थित पचले नाही तर इनडाइजेशनसारखी समस्या सुरू होते. म्हणून जर तुम्हाला खाल्ल्यानंतर जेवण व्यवस्थित पचवाचे असेल तर पोटावर झोपणे टाळा.