मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हिंगाचे 7 अद्वितीय फायदे

हिंग केवळ पदार्थांचा स्वाद वाढत नसून त्याचे अनेक फायदे आहेत. पाहू त्यातून 7 अद्वितीय फायदे:
* वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो.

* उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल.
छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

* मेमरी कमजोर झाल्यावर 10 ग्राम शेकलेल्या हिंगाला पादरं मीठ आणि 80 ग्राम बाय-बडंगसह दळून दररोज थोड्या मात्रेत पाण्यासोबत सेवन करावे. 
जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल.

* टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे.
डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे.