शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (00:11 IST)

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल, जाणून घ्या कसे..

हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि श्वसनमार्गाची नळी आक्रसून जाते. अशात रक्तदाब आणि श्वास नियंत्रित करणे फार महत्त्वाचे आहे. रक्तदाबच्या रुग्णांना जेवणांमध्ये खडे मीठ द्यायला पाहिजे, याने रक्तदाब नियंत्रणात राहील. तसेच या रुग्णांनी तांदूळ, दही, उडीद डाळ, साखराचे प्रयोग कमीत  कमी करायला पाहिजे. हृदय रुग्णांना गरम पाण्याने अंघोळ करून भाप घेतली पाहिजे. ज्याने हृदयात रक्त पुरवठा नियमितपणे चालू राहतो.
 
* सुंठ, काळे मिरे, तुळशीचे मिश्रण फायदेशीर - तीन ते चार लीटर पाण्यात सुंठ, काळे मिरे आणि तुळशीचे पाने उकळून घ्यावे. नंतर त्याला गाळून त्या पाण्याचे सेवन करा. याने कफ बनणार नाही. आणि संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही श्वास आणि हृदयाच्या समस्येपासून दूर राहाल.  
 
* सकाळी आणि संध्याकाळी फिरू नका - दिवाळीनंतर प्रदूषण आणि गारवा वाढतो. अशा परिस्थितीत श्वास आणि हृदय रोग असणार्‍या रुग्णांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि फिरणे टाळायला पाहिजे. अशा परिस्थितीत त्यांनी दुपारी सूर्यप्रकाशात फिरावे.
 
* इनहेलर घेण्यास घाबरू नका - दम्याचे रुग्ण इनहेलर्स योग्य प्रकारे घेत नाही. केवळ 22 ते 25 टक्के लोक इनहेलर वापरू शकतात. म्हणून या रुग्णांनी योग्य प्रकारे इनहेलरचा वापर करावा.  
 
* ही सावधगिरी बाळगा -
1. दमाचे औषध आणि कंट्रोलर इनहेलर्स नेहमी आपल्या जवळ ठेवा.  
2. सिगारेट, सिगारच्या धुराशी स्वत:चा बचाव करा.  
3. फुफ्फुसांला मजबूत करण्यासाठी श्वासाचे व्यायाम करा.
4. थंडीपासून स्वत: ला वाचवा.
 
* हे करू नका -
1. घरात धूळ होऊ देऊ नका आणि घराला अस्वच्छ ठेवू नका.
2. थंड पेय, आइसक्रीम आणि फास्ट फूडचे सेवन करू नका.