1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (10:14 IST)

कोरोना काळात आचार्य चाणक्याच्या या 3 गोष्टी संकटापासून वाचवतात

chanakya niti
आचार्य चाणक्याच्या बऱ्याच गोष्टी आजतायगत प्रासंगिक आहेत. चाणक्याच्या युगात देखील सर्वत्र साथीचा रोग पसरला होता. त्यापासून वाचण्यासाठी बरेच उपाय केले जायचे. चला तर मग जाणून घेऊ या की चाणक्याचे विचार आपल्यासाठी कसे कामी येऊ शकतात.
 
1 स्वच्छता, सुरक्षा आणि शिस्तबद्धता - आचार्यांच्या मते, साथीच्या रोगाच्या संकटकाळी राज्य आणि विद्वानांनी जे काही सुरक्षाचे उपाय सांगितले असतील त्यांचे पालन करावे. हे आपल्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. 
 
दुसरे असे की या साथीच्या रोगाशी लढण्यासाठी स्वच्छता राखावी. स्वच्छता असे शस्त्र आहे की ज्या मुळे साथीचे रोग पळून जातात. या दरम्यान माणसाला आळस सोडून शिस्तबद्धत जीवन जगले पाहिजे. या साठी वेळेवर जेवण करायला हवं आणि झोपायला हवं. लोकांना या साथीच्या रोगापासून वाचण्यासाठी घरात राहणं योग्य आहे. जे लोक घरातून बाहेर पडतात त्यांना या रोगाचे संसर्ग होण्याची किंवा त्यांच्या मुळे इतर लोकांना ते संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 
 
2 उत्तम आहार - आचार्य चाणक्याच्या मते, चांगला आहार आणि व्यायामाद्वारे कोणतेही आजार दूर केले जाऊ शकतात किंवा त्यांच्यामुळे बळी होण्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. या मुळे शरीरात रोगाविरुद्ध रोग प्रतिकारक शक्तीचे निर्माण होते. या साठी व्यक्तीने आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी नियमितपणे पौष्टिक आहार घ्यावा आणि व्यायाम करावा.
 
3 वाईट लोकांपासून दूर राहावं - संकटाच्या काळी गुन्हेगारी आणि छळ कपट देखील वाढतात. आचार्य चाणक्य म्हणतात की वाईट चारित्र्य असणाऱ्या, दुसऱ्यांचा छळ करणाऱ्या आणि अशुद्ध जागी राहणाऱ्या व्यक्ती सह जो कोणी मैत्री करतो तो लवकरच नष्ट होतो.
 
आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाला वाईट संगती पासून वाचून राहावं. ते म्हणतात की माणसाचे चांगले या मध्येच आहे की शक्य तितक्या लवकर वाईट माणसाची संगत सोडावी. जे माणसाच्या भविष्यासाठी चांगले आहे. या शिवाय जो माणूस आपल्या सामोर गोड-गोड बोलतो आणि नंतर मग तो आपले काम बिघडवतो. अशा माणसाचा त्वरितच त्याग करावा. चाणक्य म्हणतात की ते अशा भांड्यासारखे असतात, ज्यांच्या वरील भागाला दूध लागलेलं असत पण आतून ते विषारी असतं. 
 
त्याच प्रमाणे चाणक्य म्हणतात की मूर्खाप्रमाणे तारुण्यपण देखील वेदनादायी असत. कारण तारुण्यपणात क्षणिक लैंगिक सुखासाठी कोणी ही वाईट काम करू शकतो. पण या पेक्षा जास्त वेदनादायक आहे दुसऱ्यांवर अवलंबून किंवा आश्रित असणं. म्हणून वरील गोष्टींना लक्षात ठेवावं.