1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (16:49 IST)

काय सांगता, स्मृतिभ्रंशामुळे उच्चरक्तदाब होऊ शकतो..

Dementia can cause high blood pressure
आपल्या स्कुटरची चावी किंवा आपल्या महत्वाच्या वस्तू इकडे तिकडे ठेवून विसरून जाण्याची सवय असल्यास नंतर चावीला शोधून काढण्यासाठीची होणारी चिड-चिड, वैतागणं हे सगळ्यांचा घरातली सामान्य बाब आहे. पण जर ही विसरण्याची सवय आपल्याला दररोजच्या वागणुकीत येऊ लागली तर हा आजार देखील असू शकतो. हे उच्चरक्तदाबाचे लक्षण असू शकतात. 
 
संशोधकांच्या मते रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमणं उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. या मुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. संशोधक सांगतात की रक्ताचा प्रवाह मंदावल्याने मेंदूत ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो.
 
अशी परिस्थिती मज्जा संस्थेच्या पेशींवर दाब टाकते आणि त्या मरण पावतात. यामुळे त्यांची स्मरणशक्तीच नव्हे तर तर्कशक्ती आणि अनेक कार्य हाताळण्याची क्षमता देखील कमकुवत होते. 
 
तज्ज्ञ सांगतात की विसर पडण्याच्या आजार सुरु होण्यापूर्वीच रक्तदाब नियमितपणे तपासत राहणे. उच्च रक्तदाबाच्या तक्रारीला सहजपणे घेऊ नये. असे केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. एखादा माणूस केवळ हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच नव्हे तर अल्झायमरमुळे देखील आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान वर्षे गमावू शकतो.