1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

कापलेला कांदा लगेच वापरा, फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक

don't keep onion in fridge
वेळेवर घाई नको म्हणून सलाड करताना किंवा भाजीची तयारी करताना कांदा आधीपासून कापून ठेवण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. खूप आधीपासून कापून ठेवलेला कांदा खाणे अत्यंत नुकसान करणारं ठरु शकतं. तसेच कांदा कापून ‍फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये.
 
कारण कांद्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक औषधी, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टी इन्फ्लामेटरी घटक असतात. पण फ्रीजमध्ये कापलेला कांदा ठेवल्याने त्यामधील घटक नष्ट होतात. 
 
आपण सोयीसाठी कांदा सोलून जरी फ्रीजमध्ये ठेवत असाल तरी ते नुकसानकारक आहे. सोललेला कांदा आरोग्यसाठी धोकादायक ठरु शकतो कारण कांद्याची सालं काढल्यानंतर त्याला बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे कांदा ऑक्सिडाईज होतो. 
 
कांदा कापल्यावर किंवा सालं काढल्यावर त्यामधील सेल्स तुटून फ्ल्युईड्स रिलीज होतात. यातील न्युट्रीएन्ट्सची क्षमता देखील बॅक्टेरियामुळे कमी होते. कोणत्याही वातावरणात कांदा सोलून किंवा चिरुन ठेवल्यास त्यातून पाणी वाहायला सुरूवात होते. त्यामुळे यावर बॅक्टेरिया वाढतात. अशात कांदा खाणे आरोग्यासाठी अत्यंत नुकसान करणारे ठरु शकतं. चिरलेला कांदा बॅक्टेरियांसाठी चुंबकासारखे कामं करतो. 
 
अत्यंत गरज भासल्यास आपण कापलेला कांदा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. किंवा ‍फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासलीच तर सीलबंद डब्ब्यामध्ये भरून ठेवा. तसं तर गरज असेल तेव्हाच कांदा कापून आहारात सामील करावा.