रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (19:29 IST)

Eat these foods to relieve tension : टेन्शन पळवण्यासाठी खा हे पदार्थ

food dry fruits
Eat these foods to relieve tension तणाव घेण्यात काही अर्थ नाही हे माहीत असलं तरी प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावाखाली जगत असतो. पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. जसे एकाग्रता कमी होणे, चिडणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे व इतर. हाच तणाव योग्य पद्धतीने हातळला गेला नाही तर आजारांना निमंत्रण देतो. आणि कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात. पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्य पदार्थ असे ही आहे जे तणावाला मात करण्यात फायदेशीर ठरू शकतात.
 
सुका मेवा: बदाम, काजू, मनुका, अक्रोड, खजूर किंवा शेंगदाणेही ताण कमी करायला मदत करतात. हे पदार्थ भरपूर प्रमाणात खायचे नाहीये. फक्त 2-2 बदाम/काजू/खजूर, एखादं अक्रोड पुरेसे होतील.
 
मायक्रोबायोटिक आहार: मेंदूला योग्य प्रमाणात ग्लूकोजचा पुरवठा आवश्यक असतो. पण ग्लूकोज म्हणजे डायरेक्ट साखर घेयला नको. अशात पॉलिश न केलेली धान्यं वापरली तर जास्त चांगले परिणाम समोर येतील. ब्राउन राईस, गव्हाचं पीठ, भरडलेले धान्य, नाचणी, सातू, राजगिर्‍याचे पीठ वापरायला हवे.
 
केळं: त्वरित एनर्जी प्रदान करणारा हा फळ आपली मदत करतं. वजन वाढतं म्हणून केळी खाणे टाळणारे लोकांसाठी हा सल्ला आहे की इतर जंक फूडसुद्धा लठ्ठपणासाठी जबाबदार असतात, त्यासाठी एवढ्या गुणकारी फळाला सोडणे योग्य नाही.
 
अ, ब आणि क जीवनसत्त्व आहार: ताण वाढल्यास अ, ब आणि क जीवनसत्त्व आहार घ्यावा. आपल्या आहारात भाज्या, फळे, दूध, डाळी, कडधान्य, मेवे व इतर पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावे.
 
टेन्शन वाढलं तरी हे टाळा:
कोल्ड ड्रिंक, चहा, कॉफीचे अतिरिक्त सेवन
जंक फूड खाणे
अती आहार घेणे
जेवण टाळणे
व्यसनाच्या आहारी जाणे