रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (13:22 IST)

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास झाल्यास काय करावे, जाणून घ्या

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे.अशा परिस्थितीत कडक उन्हासोबत गरम हवा वाहू लागते. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
 
अति उष्णतेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
शरीराचं तापमान वाढल्यास रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. याचा परिणाम रक्तदाब कमी होतो. त्यामुळे शरीराकडे रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला अतिरिक्त कष्ट पडतात.
यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम शरीराला खाज सुटणे किंवा पाय सुजणे, यासारखी सौम्य लक्षणं दिसू शकतात.
 
त्याचवेळी, अति घाम आल्याने शरीरातील पाणी, क्षार कमी होतात. आणि मुख्य म्हणजे शरीराचं संतुलन बिघडतं.यात कमी रक्तदाब, थकवा येणे ही लक्षणे सुद्धा समाविष्ट आहेत याशिवाय
 
* चक्कर येणे.
* मळमळणे.
* शुद्ध हरपणे.
* गोंधळलेली अवस्था.
* स्नायूंमध्ये पेटके येणे.
* डोकेदुखी.
* दरदरून घाम फुटणे.
* थकवा जाणवणे.
* वारंवार कोरडे तोंड
* धाप लागणे
* उलट्या होणं 
* उच्च ताप
* हात आणि पाय सुन्न होणे
* अशक्त वाटणे
ही लक्षणं जाणवतातच पण जर रक्तदाब खूपचं कमी झाला तर हृदयविकाराचा धोका वाढतो.
 
उष्माघात झालेला व्यक्ती पाहिल्यास काय करावं ?
जर ती व्यक्ती अर्ध्या तासाच्या आत सामान्य स्थितीत आली तर हा उष्माघात तितकासा गंभीर नसतो. व्यक्ती सामान्य स्थितीत आली नाही तर हे गंभीर असू शकत. 
 
उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड सावलीच्या ठिकाणी हलवा.
त्यांना झोपवून आणि त्यांचे पाय किंचित वर उचला.
त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या - स्पोर्ट्स किंवा रिहायड्रेशन ड्रिंक्स दिले तरी चालते.
शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या शरीरावर थंड पाण्याने स्प्रे करा, स्पंजने पुसून घ्या, त्यांना वारा घाला. काखेत किंवा मानेभोवती थंड पट्ट्या ठेवा.
मात्र एवढं करूनही 30 मिनिटांत रुग्ण सामान्य स्थितीत न आल्यास त्याला उष्माघात झालाय असं समजावं.
उष्माघाताला बळी पडलेल्या लोकांच्या शरीराचं तापमान जास्त असलं तरी त्यांना घाम येणं बंद होतं, त्यांच्या शरीराचं तापमान 40 सेल्सिअसच्या पुढे गेलं असलं तर त्यांना अपस्माराचा झटका येऊ शकतो किंवा ते बेशुद्ध पडू शकतात. अशा परिस्थितीत त्वरित रुग्णाला रुग्णालयात न्यावे .