गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

... असे असेल तर मुळीच खाऊ नये लसूण

Garlic
तसं तर लसूण खाणे आरोग्यदृष्ट्या अत्यंत फायद्याचं असतं. परंतू आपल्याला या 5 पैकी एक देखील समस्या असेल तर लसूण खाणे टाळणे योग्य ठरेल:
 
1 अॅसिडिटी, हार्टबर्न, पोटातील अल्सर आणि अतिसार सारखे आजार असणार्‍यांनी लसूण खाणे टाळावे.
 
2 ऍनिमियाच्या रुग्णांसाठी देखील लसणाचे सेवन हानिकारक ठरू शकतं. अशात लसणाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. 
 
3 आपल्याला कमी रक्तदाब अर्थात लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर लसूण खाऊ नये. लसूण रक्तदाब कमी करतं म्हणून हाय ब्लडप्रेशर असणार्‍या लोकांना लसूण वापरण्याचा सल्ला दिला जातो.
 
4 गर्भावस्थेत अती प्रमाणात लसूण खाणे हानिकारक ठरू शकतं. लसणाची प्रकृती उष्ण असल्यामुळे गर्भस्थ शिशूसाठी हे धोकादायक ठरू शकतं.
 
5 आपण ऑपरेशन किंवा सर्जरी करण्याच्या तयारीत असाल तर लसणाचे सेवन आपल्यासाठी समस्या उद्भवू शकतं. हे रक्त पातळ करतं अशात सर्जरी दरम्यान अधिक ब्लीडिंग होण्याची शक्यता वाढू शकते.