शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जाणून घ्या हरभर्‍याचे गुण

chod green chana
हरभर्‍याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार समजतात. देशी हरभर्‍याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात... यातील काही प्रकार हिरव्या व काळ्या रंगाचेसुद्धा आढळतात. हिरव्या हरभर्‍याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो.  
 
हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बियात प्रथिने व कार्बोहायड्रेटस् तसेच जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
 
जेवणामध्ये हरभर्‍याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभ-याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात.  

फुले येण्याच्या सुमारास हरभर्‍याच्या पानावर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड ते दोन तास पसरून ठेवले की ते दवाने ओले होते व पानावरील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून आम्ल बाटलीत गोळा करतात, याला आम म्हणतात. 

हिरवी मिळणारी आम उत्तम औषधी असून त्यामध्ये मॉलिक अॅसिड (९० ते ९५ टक्के) ऑक्झालिक अॅीसिड (५ ते १० टक्के) असतात. ही आम वांत्या (ओकारी), अग्निमांद्य, अपचन, पटकी, अमांश व संधिभंग होते यावर शिजवलेल्या पानांचा लेप अत्यंत गुणकारी असतो. 

हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे म्हणून त्यास ‘घोडे का खाना’असे म्हटले जाते... तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटिन फुड आहे. 

हरभ-यातील प्रथिने मिळवायची असल्यास त्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला.! 

हरभ-याची पानं चवीला आंबट, तुरट असून या पानांची भाजी खाल्ल्याने आतडय़ांची स्वच्छता होते, पोट कमी होतं, हिरडय़ांची सूज नाहीशी होते, हरभर्‍याच्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पित्तज्वर कमी होतो. 

ओले चणे आणि गूळ खाल्ल्याने आवाज सुरेल होतो.