1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (00:31 IST)

केस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का?

hair fall
केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी होतात. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण यापासून केसांचे संरक्षण होते. परंतु, जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा प्रत्येक वेळी केस गळतात. असे का होते?  
 
तेलामुळे केस मजबूत होतात. त्यांचा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस तुटण्याला आळा बसतो. पण यामुळे केस गळू देखील लागतात. एका हेयर फॉलिकलमधून १-६ वर्ष केस वाढू शकतात. म्हणून जुने केस गाळून नवीन येणे ही सातत्याने होणारी प्रक्रीया आहे.
 
म्हणून जेव्हा तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा काही वेळ केसांना मसाज करा. अशावेळी केस गळले काहीसे स्वाभाविक असते. परंतु, केस गळण्याचे प्रमाण अधिक असल्यास हे काळजीचे कारण ठरेल. केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कारण केसात तेल राहिल्याने धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे स्काल्पजवळील पोर्स बुजतात आणि हेयर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात.
 
तेलकट स्काल्पमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. तसंच खूप तेल लावल्याने स्काल्पमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ लागतात.
 
टीप: केसांना मसाज करताना स्काल्पला हळुवार मसाज करा. कारण खूप जोरजोरात मसाज केल्याने केस गळू लागतील. त्याचबरोबर अधिक प्रमाणात तेल लावू नका आणि केसातील तेल निघून जाईल अशापद्धतीने स्वच्छ केस धुवा.