शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (15:49 IST)

Health Care Tips: जर आपण देखील दररोज अंडी खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या

अंडी खाणं आरोग्यासाठी चांगले मानले आहे.जर आपण दररोज अंडी खात असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.अंडी प्रथिनांनी समृद्ध असते.म्हणून अंडी न्याहारीचे पर्यायी मानले जाते.काही लोक न्याहारीत दररोज अंडी खातात.परंतु अंडी खाताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.चला जाणून घेऊ या.
 
आपल्याला माहित आहे की अंडीमध्ये अमिनो ऍसिड मुबलक प्रमाणात आढळतात .हे आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करतात.या मध्ये व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन बी,बी 12 व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतं.या शिवाय हे फॉलेट सेलेनियम आणि अनेक खनिज लवणांचे स्रोत आहे.
 
दररोज अंडी खाताना या गोष्टी लक्षात ठेवा-
* जर आपण दररोज अंडी खात असाल तर आपण अंडी एका दिवसाच्या अंतराने खाण्यास सुरुवात करा. कारण उन्हाळ्यात अंडी पचवण्यात अडचण येऊ शकते.याच बरोबर आपल्याला पोटाशी संबंधित समस्या देखील होऊ शकते,या कारणास्तव आपण दररोज अंडी खाणे टाळावे.
 
* अंडी खाताना, हे देखील लक्षात ठेवा की फक्त एकच अंडी खा आणि त्याचे सातत्य ठेवा. दररोज 2 अंडी खाणे शरीराला हानी पोहोचवू शकते.
 
* अंडी शरीराला पोषण आणि ऊर्जा प्रदान करतात, परंतु उच्च प्रथिने आणि समृद्ध पोषक घटकाने परिपूर्ण आहार पचवण्यासाठी,आपली रोगप्रतिकारक शक्ती निरोगी असणे देखील आवश्यक आहे, म्हणून दिवसातून फक्त एकच अंडी खा.
 
* जर आपण दिवसात व्यायाम किंवा योगा करत नसाल किंवा कोणतेही धावण्याचे काम करत नसाल तर आपण  दररोज अंडी खाणे टाळावे.असं केल्याने आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं.