गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दिवसातून एकदा जेवत असाल तर नक्की वाचा

अनेक लोक डायटिंग करण्याच्या नादात दिवसातून एकदाच आहार घेणे योग्य समजतात. याने वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते परंतू यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
 
नेहमीसाठी लठ्ठपणा
फास्ट वजन कमी करण्यासाठी हा उपाय योग्य ठरणार नाही कारण केवळ एकदा जेवण केल्याने उलट वजन वाढतं. याचा खूप काळापर्यंत शरीरावर प्रभाव दिसतो.
 
पचनात समस्या
एकदा जेवल्याने शरीराच्या पचन शक्तीवर विपरित परिणाम दिसून येतो. कमी जेवल्यामुळे पचन तंत्राला अधिक मेहनत घ्यावी लागते. कमी प्रमाणात आहार मिळत असल्यामुळे शरीराच्या इतर अंगांना अधिक मेहनत पडते आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येचा धोका देखील वाढतो.
 
कमजोरी
अशा डायटमुळे शरीराला कमजोरी जाणवू लागते. बेशुद्ध पडणे आणि बेचैनी असे प्रकार घडतात.
 
मेटाबॉलिझमची समस्या
आपण दिवसभर आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरीज सेवन करत असाल तर पुढे जाऊन मेटाबॉलिझम सिस्टमवर प्रभाव पडू शकतो.