मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (12:15 IST)

ताप आल्यावर कपाळावर पट्ट्या ठेवाव्या की नाही?

आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत की ताप जास्त असेल तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. परंतू वैज्ञानिक दृष्ट्या हे कितपत योग्य आहे जाणून घ्या:
 
जेव्हा ताप 101 डिग्री फॅरनहाईटहून वर गेल्यावर स्थिती गंभीर होऊन जाते. 103 डिग्रीपर्यंत ताप चढल्यास जीव कासावीस होऊ लागतो. अशात डॉक्टरांचे औषध घेत असला तरी ताप सामान्य होत नाही. अशात गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवण्याने ताप नियंत्रित करण्यास मदत मिळते. आणि ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो.
 
जेव्हा ताप 102 डिग्री फॅरनहाईटहून अधिक झाल्यात तापाला नियंत्रित करणे आवश्यक होऊन जातं अशात झटका येण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत गार पाण्यात नॅपकीन किंवा स्पंज पिळून आजारी माणसाच्या कपाळावर ठेवावे. लहान मुलं आणि वयस्क लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते कारण त्यांना झटका येण्याचा धोका अधिक असतो.
 
यासाठी ताजे पाणी घ्यावे. बर्फ किंवा बर्फाचे पाणी घेणे टाळावे. ताप अधिक असल्या केवळ कपाळावर नव्हे तर पूर्ण शरीरावर पट्ट्या ठेवायला हव्या. किंवा किमान डोकं, कपाळ, तळहात आणि तळपायावर तरी पट्ट्या ठेवाव्या. आजारी माणसाची हिंमत असल्यास अंघोळ करावी याने तापमान सामान्य होण्यात मदत मिळते.
 
ताप उतरवण्यासाठी हा उपाय स्थायी नसून केवळ तापमान सामान्य करण्याचा विकल्प आहे म्हणून बॅक्टेरिया आणि व्हायरसला लढा देण्यासाठी योग्य औषधांची गरज असते. म्हणून ताप आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.