गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (09:20 IST)

एयर कंडिशनरचे तोटे जाणून घ्या

वातानुकूलित किंवा एयर कंडिशनर उन्हाळ्यात गरम तापमानापासून आराम मिळवतात. तेही कोणतेही आवाज न करता हेच कारण आहे की आजकाल कूलर आणि पंख्यां पेक्षा एसी ची मागणी वेगाने वाढत आहे. ऑफिसात तर आठ तास एसी मध्ये बसता. परंतु माहीत आहे  का ,की जास्त वेळा एसी मध्ये बसणे हानिकारक होऊ शकतो. नाही तर मग जाणून घेऊ या. 
 
* ताप किंवा थकवा- बऱ्याच वेळ एसी मध्ये बसल्यावर सतत हलका ताप आणि थकवा जाणवू शकतो. एवढेच नव्हे तर डोकेदुखी आणि चिडचिड होऊ शकते. जर आपण एसीच्या बाहेर निघून सामान्य तापमानात येत तर आपल्याला बऱ्याच दिवस ताप येऊ शकतो.
 
* सांधे दुखी - सतत एसी मध्ये बसल्याने गुडघेदुखीचाच त्रास होत नाही तर शरीरातील सांध्यात वेदनांसह कडकपणा देखील येतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते पुढे हाडांशी निगडित रोग होऊ शकतात. 
 
* रक्तदाब आणि दमा- जर आपल्याला उच्च रक्तदाब आणि दमाचा त्रास आहे तर आपण एसी मध्ये बसणे टाळावे. 
 
* लठ्ठपणा- एसी मुळे शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो. तापमान कमी असल्याने शरीर सक्रिय होत नाही आणि ऊर्जेचा योग्य वापर होत नाही त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. 
 
* त्वचेची समस्या- एसी त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कमी करतो आणि त्वचेला कोरडी करतो या मुळे त्वचेची समस्या उद्भवते. 
 
* रक्त परिसंचरण -एसी मध्ये बसल्याने शरीराचे तापमान कृत्रिमरीत्या कमी होते. या मुळे पेशींमध्ये आकुंचन होते आणि सर्व अवयवांमध्ये रक्ताचे प्रवाह योग्यरीत्या होत नाही आणि अवयवाच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो.
 
* मेंदूवर परिणाम- 
एसीचे तापमान कमी असल्याने मेंदूच्या पेशी आकुंचन पावतात या मुळे मेंदूची क्षमता आणि कार्यावर परिणाम होतो. या मुळे वारंवार चक्कर देखील येऊ शकतात.