1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (20:04 IST)

वयाच्या 40 व्या वर्षी स्वतःची अशी काळजी घ्या आणि फिट राहा

सरत्या वयाचा प्रभाव सर्वात जास्त आपल्या त्वचे,आरोग्यावर आणि क्षमतेवर होतो. अशा परिस्थितीत शरीराच्या आरोग्या संबंधित गरजा देखील बदलतात. वयाचे 40 वर्ष ओलांडल्यावर आरोग्याशी निगडित समस्या वाढू लागतात. म्हणून आरोग्यासाठी हे टिप्स महत्त्वाचे आहेत . चला जाणून घेऊ या. 
 
1 चाळिशीनंतर अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणाव आणि चिडचिड होते .मेंदू देखील कमकुवत होऊ लागते. या साठी योगा, व्यायाम, ध्यान, संगीत आपल्या रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करावे. ते काम करावे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. 
 
2 वाढत्या वयानुसार शरीरात व्हिटॅमिन,खनिजे, कॅल्शियम, आयरन आणि अँटीऑक्सीडंटची कमतरता जाणवते. म्हणून आहारात अशा गोष्टींना समाविष्ट करा ज्या मुळे सर्व पोषक घटकांचा पुरवठा होईल. 
 
3 या वेळी शरीराचे सर्व अवयव आणि स्नायूंना जास्त परिश्रम करावे लागतात, म्हणून खाणे-पिणे व्यवस्थित ठेवा. जेणे करून लिव्हर सुरक्षित राहील आणि शरीरातील विषारी घटक बाहेर निघतील.
 
4 वाढत्या वयाप्रमाणे आहारात अधिक तेल,मसाले कमी प्रमाणात घ्यावे. जेणेकरून पचन चांगले राहील. तसेच शरीरातील सर्व अवयवांना कार्य करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागणार नाही. 
 
5 चाळिशीतील वयाच्या लोकांना अँटीऑक्सीडेंटयुक्त आहार घ्यायला  पाहिजे. जसे की हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, सॅलड, फळे, ग्रीन टी इत्यादींचे सेवन करावे. 
 
6 अत्याधिक राग आणि काळजी करणे टाळावे. शारीरिक परिश्रम देखील तेवढेच करावे जेवढे आरोग्यासाठी योग्य आहे. अत्यधिक परिश्रम करणे टाळावे. 
 
7 कडधान्ये आपल्या आहारात समाविष्ट करा आणि भरपूर फळे घ्या. 
 
8 स्वयंपाक करताना ओमेगा-3 ,ओमेगा -6 , फॅटी ऍसिड युक्त तेलाचा वापर करावा. या शिवाय बदामाचे तेल, आळशी ,तीळ,शेंगदाणे आणि अक्रोडाचे सेवन करावे. या मध्ये ओमेगा -3 आढळते आणि हे कोलेस्ट्रॉल फ्री असतात. 
 
9 चाळीशी नंतर आपण आपल्या सवयी आणि नित्यक्रमात बदल करा. या अवस्थेत शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान नसते. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल आणून ऊर्जेसह दीर्घ आयुष्य मिळेल. 
 
10 घरात बनलेले पौष्टिक सूप देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधून भूक लागल्यावर आपण सुपाचे सेवन करू शकता.