1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (19:34 IST)

Room Heater Risk : रूम हिटरचा वापर करताना त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

Room Heater
Room Heater Risk : हिवाळ्यात खोली उबदार ठेवण्यासाठी तुम्ही रूम हीटर किंवा ब्लोअर सारखी उपकरणे देखील वापरले जाते.बंद खोलीत अशी उपकरणे  बंद खोलीत ठेवल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक ठरू शकतात. 

हिवाळ्याच्या मोसमात उष्णता मिळविण्यासाठी त्यांचा वापर जवळजवळ प्रत्येक घरात केला जातो, परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या
 
कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढू शकते-
रूम हिटर वापरताना काही खबरदारी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्ही हीटर वापरत असलेल्या कोणत्याही खोलीत चांगली वायुवीजन व्यवस्था असावी. बंद खोल्यांमध्ये हीटरचा जास्त वापर केल्याने हवेतील कार्बन मोनोऑक्साइड किंवा नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे डोळे, नाक आणि घशात जळजळ होऊ शकते.
 
याव्यतिरिक्त, कार्बन मोनोऑक्साइडच्या उच्च पातळीच्या श्वासोच्छवासामुळे विषबाधा होऊ शकते, परिणामी डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ इ. काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील असू शकते. हीटरचा अतिवापर करणेही धोकादायक ठरू शकते.
 
हवेतील आर्द्रता कमी होणे- 
रूम हिटरमुळे खोलीतील हवा कोरडी होते, परिणामी हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा, डोळ्यांना जळजळ आणि खाज सुटू लागते, घसा कोरडा होऊ लागतो. दीर्घकाळ असे केल्याने श्वसनाचा त्रास, नाक बंद होणे आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो.
 
ऍलर्जी आणि दम्याच्या समस्या वाढणे- 
हिटरमुळे हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे तुमच्यामध्ये काही प्रकारच्या ऍलर्जीच्या समस्या देखील उद्भवू शकतात. आधीच संवेदनशील व्यक्तींमध्ये किंवा ज्यांना दमा किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांचा इतिहास आहे अशा लोकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. 
 
अशी खबरदारी घ्या- 
आरोग्य तज्ञ म्हणतात की जेव्हा जेव्हा अशी उपकरणे वापरली जातात तेव्हा खोलीत ताजी हवा प्रवेश करण्यासाठी योग्य व्यवस्था केली पाहिजे. हीटर खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवूनच वापरावे. हीटर चालू ठेवून कधीही बंद खोलीत झोपू नका, ही गंभीर समस्या असू शकते हे लक्षात ठेवा.
 
Edited By- Priya DIxit