बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (17:37 IST)

औषधी गुणधर्म असलेल्या पुदिन्याचे फायदे जाणून घ्या

पुदिन्याची चटणी तुम्ही कचोऱ्या किंवा पकोड्यांसोबत खाल्ली असेल. त्याची चव मनाला तजेला देते. पुदिन्याची चटणी फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पुदिन्यात प्रथिने भरपूर असतात आणि चरबी आणि कॅलरीज कमी असतात. पुदिन्यात व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्स सारखे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पुदिन्याच्या पानांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा उजळते. पुदिन्याच्या पानांमध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅंगनीज चांगल्या प्रमाणात असतात जे मेंदूच्या कार्याला चालना देतात आणि हिमोग्लोबिन प्रोफाइल सुधारतात.  चला पुदिनाचे फायदे जाणून घेऊ या .
 
1 अपचन दूर करणे -पुदिना आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. पुदिन्याची चटणी खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
 
2 खोकला आणि सर्दी मध्ये आरामदायी - आपली श्वसनसंस्था स्वच्छ करण्यासाठी पुदिना देखील फायदेशीर आहे. पुदीना सर्व हानिकारक पदार्थ काढून टाकून आपले नाक, घसा आणि फुफ्फुस स्वच्छ करण्यास मदत करते. पुदिन्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म खोकला आणि घशातील जळजळ यापासून आराम देतात. 
 
3 डोकेदुखी पासून आराम देते-  पुदिन्याच्या सेवनाने डोकेदुखी दूर होण्यासही मदत होते. पुदिन्याच्या तीव्र आणि ताजेतवाने वासामुळे मूड फ्रेश होतो आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. 
 
4 पुदिन्याच्या पानांचे सेवन आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पुदिन्याची ताजी पाने चघळल्याने श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडाच्या आत बॅक्टेरियाची वाढ रोखतात. पुदिन्याच्या पानांच्या वापराने दातांवर साचलेली घाण दूर होऊन दात स्वच्छ होतात.  
 
5 वजन कमी करण्यास उपयुक्त -वजन कमी करण्यासाठीही पुदिन्याची पाने फायदेशीर मानली जातात. पुदिनाच्या पानाचे  सेवनाने पाचक एन्झाईम्स सक्रिय होतात, जे अन्नातून पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यास मदत करतात. पुदिन्याच्या सेवनाने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
 
6 पुदीनाने सौंदर्य उजळते -पुदिना केवळ आरोग्यच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात जंतुनाशक गुणधर्म आहेत, म्हणून ते बॉडी क्लीन्सर, साबण आणि फेस वॉशमध्ये वापरले जाते. विशेषत: तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पुदिन्याची पाने खूप गुणकारी आहेत. यामुळे त्वचेवर साचलेली घाण निघून जाते आणि त्वचेची आर्द्रताही कायम राहते.