गाजर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर, दररोज सेवन करा
आपण आपल्या अन्नामध्ये बऱ्याच खाद्य पदार्थांचा समावेश करतो, जेणे करून आपल्या शरीराला फायदा मिळावा. या व्यतिरिक्त आपण बरेच प्रकाराच्या ज्यूसचे सेवन करतो, कारण या मध्ये असलेले अँटी -ऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन सी त्वचेसह इतर फायदे देतात. लोक डाळिंब, ऊस, मोसंबी किंवा फळाचे मिश्रित ज्यूस पितात. पण या सर्वात उत्तम आहे ते म्हणजे गाजराचा ज्यूस पिणं. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपण गाजराचा ज्यूस पीत असाल तर आपल्याला त्याचे फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या गाजराच्या फायद्यां बद्दल.
आपण गाजराचे ज्यूस पीत असाल किंवा ह्याला सॅलड रूपाने सेवन करत असाल तर या मध्ये असलेले घटक शरीराला मिळतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए,सी,के,बी 8 या सह अनेक खनिजे आढळतात. अशा परिस्थितीत नियमितपणे गाजराचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात.
आपण चेहऱ्यावर तजेलपणा येण्यासाठी काय काय करत नाही. महागड्या क्रीम वापरतो पण जर दररोज गाजराचा ज्यूस पीत असाल किंवा सॅलड खात असाल तरी आपल्या चेहऱ्यावर चमक येते.
गाजर रक्तातील विषाक्तता कमी करतो म्हणून ह्याचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका होण्यास मदत मिळते.
गाजर मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतो जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक आहे. ह्याचे नियमानं सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते.
गाजर सॅलड किंवा ज्यूस रूपात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
तसेच, गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरीरास फायदा होतो. जर आपण गाजराचा ज्यूस पीता, तर शरीरात हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. शरीराची पचन शक्ती देखील गाजराच्या सेवन केल्याने वाढते, कारण या मध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळतो.
आजच्या युगात फुफ्फुस आणि कर्करोग सारख्या आजाराचा धोका संभवतो, पण गाजराचे नियमितपणे सेवन केल्याने या धोक्याला कमी करण्यात मदत होते.
गाजरामध्ये केरोटीनॉयड आढळते हे हृदय रोग्यांसाठी योग्य मानले जाते. गाजर खाल्ल्याने दातांची चमक वाढण्यासह हिरड्यांमधून येणारे रक्त देखील थांबते.
या मध्ये बीटा केरोटीन आढळते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले आहे.
खोकला थांबत नसेल तर गाजराचे रस काढून त्यामध्ये काळी मिरपूड घालून प्यायल्याने खोकल्यात आराम मिळतो. या शिवाय गाजर रक्त वाढविण्याचे काम करतो.