सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (17:24 IST)

Pressure Cooker Side Effects : प्रेशर कुकर आजारांचे कारण बनू शकतो

pressure cooker side effects
Pressure Cooker Side Effects : कुकरमध्ये जेवण बनवण्याने होऊ शकतात हे चार नुकसान 
* कुकरमध्ये जेवण बनवल्याने बद्धकोष्ठता आणि पचन संबंधी समस्या होऊ शकतात. 
* कुकरमध्ये जेवण बनवल्याने जेवणातील पोषकतत्वे नष्ट होतात.
* कुकरमध्ये स्टार्च युक्त पदार्थ व्यवस्थित शिजत नाही. या मुळे वजन वाढू शकते. 
* कुकरमध्ये भात शिजवल्याने त्यात कार्ब्स आणि स्टार्च यांची मात्रा अधिक प्रमाणात होते. 
 
भारतातील प्रत्येक घरात प्रत्येक दिवशी कुकरची शिट्टी वाजतांना दिसते. प्रेशर कुकरमध्ये वरण भात सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात तसेच वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. सोबतच प्रेशर कुकरमध्ये केक पण बनवतात पण तुम्हाला माहित आहे का, की प्रेशरकुकर मध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. प्रेशर कुकर तुमच्या पचन तंत्राला आणि शरीराच्या अन्य अवयवांना प्रभावित करतो. कुकर मध्ये  जेवण बनवणे खूप सोपे असते आणि ते खूप कमी वेळात पण बनते. म्हणून लोक प्रेशर कुकरचा जास्त प्रमाणात उपयोग करतांना दिसतात. 

पण प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आणि मोकळ्या भांडयात जेवण बनवणे यात खूप फरक असतो. चला तर जाणून घेऊ या प्रेशर  कुकरमध्ये जेवण बनवून ते सेवन केल्याने काय  नुकसान होते. 

१. पचन समस्या-
कुकरमध्ये जेवण हाय प्रेशरमुळे लवकर शिजते तसेच अन्न हे स्वतः  न शिजता वाफेमुळे शिजते. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता  आणि अपचनाची समस्या होऊ शकते. याचबरोबर तुमचे पचनतंत्र  पण ख़राब होऊ शकते. 

. पोषकतत्त्वाची कमी-
प्रेशर कुकरमध्ये जेवण खूप हाय टेंप्रेचर वर शिजते. यामुळे अन्नात असलेले पोषकतत्वे नष्ट होतात. म्हणजे ते कमी देखील होतात. यामुळे जेवल्यानंतर अन्नातील पोषकतत्वे शरीराला कमी प्रमाणात मिळतात. या मुळे अंगदुखी सारखी समस्या निर्माण होते. 

३. वजन वाढते-
यासोबतच प्रेशरकुकर मध्ये स्टार्च युक्त पदार्थांना सेवन केल्या नंतर ते पचवणे  मुश्किल होते. सोबतच शौचाची पण समस्या निर्माण होते. कारण पोट भारी जेवण लगेच पाचवू शकत नाही. 

४.भात शिजवणे अपायकारक-
नेहमी आपण कुकरमध्ये भात शिजवणे पसंद करतो. कारण कुकरमध्ये भात शिजवणे अगदी सोपे  असते. व भात ही पटकन शिजतो. भात शिजवतांना कुकरमधील पाणी वाळून जाते. त्यामुळे भातात जास्त प्रमाणात कार्ब्स आणि स्टार्च जमा होतो आणि  ज्यामुळे फॅट वाढण्याची शक्यता असते.