शॉपिंग मॉल जातायं... मग ही खबरदारी घ्या
सध्याच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता जेव्हा आता सगळीकडे सर्व काही सुरु झाले आहेत, तथापि कोरोना अद्याप काही संपलेला नाही. म्हणून आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही खबरदारी घ्यावयाची असते. जसे की सामाजिक अंतर राखणं, मास्क लावणं तसेच वारंवार हात धुणं. कोरोना व्हायरस टाळण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे सावधगिरीनेच पुढे जाणं. घरातून बाहेर पडल्यापासून ते घरात येईपर्यन्त आपल्याला काय करावयाचे आहे हे माहित असणं गरजेचं आहे.
आता हळू-हळू लोक आपल्या नेहमीच्या दिनचर्येकडे वळत आहे. अश्या परिस्थितीत आपली जवाबदारी वाढते की अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला सावधगिरी आणि जागरूकता बाळगण्याची गरज आहे. आपल्यापैकी असे काही लोक आहे जे वर्दळीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत तर काही लोकांनी सर्रास बाहेर येणं-जाणं सुरु केले आहे. जर आपण देखील एखाद्या मॉल मध्ये किंवा वर्दळीच्या ठिकाणी जात असाल तर आपल्याला देखील काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
* मॉल मध्ये गेल्यावर सर्वात आधी आपल्याला पार्किंग मध्ये जावं लागतं. आपण आपली गाडी तिथे लावत असताना तिथे कर्मचारी उभे असतात, जे बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतात. अश्या परिस्थितीत आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की त्यांनी मास्क आणि ग्लव्ज घातले आहेत की नाही. जर पार्किंग मधल्या कर्मचार्यांनी मास्क आणि ग्लव्ज घातलेले नसतील तर त्यांना आपल्या गाडीला हात लावू देऊ नका.
* मॉल मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी लक्षात ठेवावं की थर्मल स्कॅनींग केल्या शिवाय मॉल मध्ये प्रवेश करू नये.
* मॉल मध्ये शारीरिक स्पर्श करणं टाळावं. मास्क आणि ग्लव्ज न वापरता जाऊ नये. आपल्याला या दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवावं.
* मॉल मध्ये प्रवेश करताना जर आपण रांगेत असाल तर लक्षात असू द्या की आपल्याला रांगेत असणाऱ्या लोकांशी योग्य अंतर राखायचे आहे.
* एस्केलेटर आणि लिफ्टचा वापर देखील काळजी पूर्वक करायचा आहे. एस्केलेटर वापरताना आपल्याला नेहमी एक पायरी सोडून उभारायचे आहे. लक्षात ठेवा की आपल्याला ग्लव्ज घालायचे आहे कारण एस्केलेटर चढताना आपण पट्टीला स्पर्श करता. या साठी आपल्याला ग्लव्ज घालणं महत्वाचं आहे. म्हणून ग्लव्ज न घालता एस्केलेटरच्या पट्टीला स्पर्श करू नये.
* लिफ्टचा वापर करताना हातात टिशू ठेवा. लिफ्टचं बटण हाताळताना टिशू वापरा नंतर या टिशुला फेकून द्या.
* लिफ्ट मध्ये सामाजिक अंतर राखा, अंतराच्या चिन्हांवरच उभारा.
मॉल मध्ये स्वछतागृह वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
* सर्वात महत्वाचे म्हणजे की आपण मॉल मध्ये टॉयलेट जाणं टाळावं.
* जर आपण टॉयलेटचा वापर करत असाल तर आपल्या हातात टिशू ठेवावं आणि त्याचा साहाय्यानेच टॉयलेटचं दार बंद किंवा उघडा.
* टॉयलेटचा वापर केल्यावर हात धुतल्यावर आपल्या हाताला स्वतःच्या सेनेटाईझरने सेनेटाईझ करावं.