मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (11:17 IST)

सोमॅटीक लक्षण डिसऑर्डर म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार

somatic symptom disorder: ज्यावेळी एखाद्या माणसाला आपल्या शारीरिक लक्षणांबद्दल अती काळजी वाटू लागते त्यावेळी सोमॅटीक लक्षण डिसऑर्डर म्हणजे एस एस डी ची सुरुवात झालेली असते. ती व्यक्ती अती विचार करू लागते. त्या व्यक्तीला आता आपण आपल्या जीवनातील दैनंदिन काही ही कामे करू शकत नाही किंवा करता येणार नाही असे वाटू लागतं. 
 
अशा परिस्थितीत ती व्यक्ती नियमित वैद्यकीय समस्येलाही जीव घेणे समजू शकते. सामान्य चाचणी करून औषधोपचार करून किंवा वैद्यकीय परामर्श घेऊन सुद्धा त्या रुग्णांमध्ये काहीही सुधारणा होत नाही. 
 
सोमॅटीक लक्षण डिसऑर्डरच्या प्रभावाखाली आलेल्या रुग्णाला या आजाराची लक्षणे कमी करता येत नाही. या आजारामध्ये बऱ्याच वेळा कोणतेही शारीरिक कारणे सापडत नसतात. तरीही लक्षणे तशीच असतात. याचा समस्या आणि त्याच्या वेदना सुद्धा वास्तविक असतातच.
 
कारणे - 
सोमॅटीक लक्षण डिसऑर्डर हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळून येते. वयाच्या 30 व्या वर्षाआधीच ह्या आजाराची लक्षणे दिसू लागतात. हे आजार कुठल्या परिस्थिती मध्ये होतात हे सांगणे अवघड आहे. काही घटक यासाठी कारणीभूत असू शकतात.
 
* नकारात्मक दृष्टिकोन- माणसाच्या मनात नकारात्मकता आल्याने पण ह्याचे लक्षणे दिसू लागतात.
* शारीरिक आणि भावनिक दृष्टया संवेदनशील असणे.
* कौटुंबिक इतिहास किंवा संगोपन 
* अनुवंशशास्त्र 
 
एखाद्या व्यक्तीचा शारीरिक किंवा मानसिक लैंगिक अत्याचाराचा इतिहास असेल तर या आजाराचे लक्षण दिसू शकतात.
 
लक्षणे : 
एस एस डी या आजारामध्ये काही शारीरिक लक्षणे उद्भवू शकतात.
* वेदना 
* अशक्तपणा जाणवणे
* धाप लागणे 
 
या आजारामधील लक्षणे कधी सौम्य तर कधी गंभीर पण असू शकतात. कधी कधी लक्षणे एकाएकी उद्भवतात तर कधी नाहीसे होतात. या साठी काय उपाय योजता येऊ शकतात. 
 
* लक्षणांबद्दल काळजी वाटते.
* मनात असे वाटते की सौम्य लक्षणे देखील गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात.
* वैद्यकीय परामर्श घ्या आणि चाचण्यांवर विश्वास ठेवावा.
* आरोग्याच्या समस्येवर दुर्लक्ष करू नका.
* वैद्यकीय परामर्श घेण्यासाठी भरपूर वेळ द्या.
 
उपचार :
* उपचार म्हणजे आपल्या लक्षणांवर नियंत्रण ठेवणे.
* तणाव आणि काळजी घेणे टाळावे.
* शारीरिक बदल आढळल्यास त्वरित वैद्यकीय परामर्श घ्यावे.
* आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी चांगले कार्य करा.
* शारीरिक लक्षणांवर लक्ष केंद्रित करणे टाळावे.