सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (17:50 IST)

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट..

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक प्रमाणात प्रथिनं समाविष्ट करण्याची गरज असते.
 
जसं जसं वय वाढतं स्नायू कमकुवत होत जातात, त्यासाठी वाढत्या वयात आपल्या आहारात अधिक प्रमाणात प्रथिनं समाविष्ट करण्याची गरज असते.
 
सरत्या वयामुळे आपल्या स्नायूंची शक्ती कमकुवत होते, म्हणूनच आपल्या आहारात अधिक प्रमाणात प्रथिनं समाविष्ट करण्याची गरज असते. वाढत्या वयानुसार स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी प्रथिनांची आवश्यकतेला दुर्लक्षित करता येणार नाही. एका प्रौढ म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त असलेल्या माणसांसाठी आहारातील प्रथिनं शरीरातील वजनाचं 0.8 ग्रॅम दररोज पाहिजे, पण काही अभ्यासामधून हे दिसून येते की वयोगट 65 वर्षाच्या प्रौढांसाठी या पोषक घटकाची उच्च पातळीची आवश्यकता असू शकते, कारण स्नायू वय सरता सरता कमकुवत होतात. या मुळे त्यांचा कामगिरीवर परिणाम पडतो.
 
सार्कोपेनियामुळे ग्रस्त असल्यास स्थिती आणखीनच खराब होते, ज्यामुळे स्नायूंचे नुकसान होते.
 
वृद्धत्वेंमुळे, स्नायू कमकुवत होतात. या स्थितीला सार्कोपेनिया म्हणतात. शरीरासाठी प्रथिनं खूप महत्त्वाची असतात. शरीरातील प्रत्येक सजीव पेशींसाठी प्रथिनं आवश्यक असतात. हे प्रामुख्याने अमिनो आम्लाने बनलेले असतात. पेशींना ऊर्जा देतात. सकाळच्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणात संतुलित प्रमाणात प्रथिनं घेणं फायदेशीर असत. या मुळे वयोवृद्ध लोकांच्या स्नायूंना वाढत्या वयाप्रमाणे बळकट ठेवण्यास मदत मिळते.
 
एका संशोधनानुसार वृद्धांमध्ये प्रथिनं त्यांच्या एकूण कॅलरीच्या प्रमाणात 30 ते 35 टक्के असावं. तसेच दुसरीकडे सार्कोपेनिया ने ग्रस्त असलेल्या एका प्रौढ व्यक्तीला दररोज 25 ते 30 ग्रॅम प्रथिनांची गरज असते.
 
प्रथिनं मध्ये योग्य पोषक घटकाची योग्य आवृत्तीची निवड करणं देखील महत्त्वाचे असते. ल्युसीन नावाचे अमिनो ऍसिड निवडावं. या साठी सर्वात उत्कृष्ट स्रोत म्हणजे मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहे. हे सोयाबीन, इतर बीन्स, शेंगदाणे आणि इतर बियाणांपासून मिळवता येत. यात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असू शकतो.
 
शेंगा : हे भाज्यांचे वर्ग आहे, यात सोयाबीन, मटार आणि डाळी आहेत. ते सर्वात पौष्टिक खाद्य पदार्थांमध्ये एक आहेत. हे प्रथिनं चे चांगले स्रोत आहे. शेंगा हे शाकाहारींसाठी मांसाहाराचे एक स्वस्थ पर्याय असू शकत. या मध्ये चरबी आणि कॉलेस्ट्राल जास्त प्रमाणात असत.
 
सॅल्मन मासे : सॅल्मन मासे ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. या मध्ये कमी चरबी असते. हे आरोग्यास फायदेशीर असतं. मासात विविध प्रकारांचे व्हिटॅमिन, खनिजे आणि इतर अन्य पोषक तत्त्व आढळतात. म्हणून मासांचे सेवन शरीराच्या गरजांना पूर्ण करतं.
 
अंडी : एका अंड्यात साधारणपणे 6 -7 ग्रॅम प्रथिनं असतं, बरेच लोकं असं समजतात की प्रथिनं हे फक्त अंड्यांच्या पांढऱ्या भागातच असतं, पण अंड्याचा पिवळ्या भागात सर्व पोषक तत्त्व आणि चरबी आढळते. अंडी प्रथिनांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे देखील स्रोत आहेत.
 
दही : दही प्रथिनांचे एक उत्तम स्रोत आहेत प्रथिनांच्या प्रत्येक कमतरतेची पूर्णता करण्यास हे खूप प्रभावी आहे. हे माणसाचे वय वाढविण्यास मदत करतं.
 
कॉटेज चीज : कॉटेज चीज मध्ये चरबी आणि कॅलरी कमी असतात. हे प्रथिनांचा चांगला स्रोत असण्या व्यतिरिक्त, अश्या प्रकारच्या चीज मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक घटक असतात.
 
टीप : रोगाच्या निदानासाठी दिलेल्या माहितीचा वापर तज्ज्ञांचा सल्ल्याशिवाय करू नये.