1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (09:49 IST)

काय सांगता, चहाचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात

tea side effects
होय, जास्त चहा पिणं हानिकारक आहे. जर आपणास पुन्हा पुन्हा चहा पिण्याची सवय असल्यास सावधगिरी बाळगा. कारण या मध्ये असलेल्या कॅफिनमुळे लघवीचे प्रमाण तीन पटीने वाढतात. 
 
चहा प्यायल्याने कॅफिन मुळे मूत्रवृद्धी झाल्यामुळे शरीराची घाण (मल) मूत्रावाटे निघणे आवश्यक असते. ती घाण शरीराच्या आतच जमा होऊ लागते यामुळे संधिवात वेदना, किडनीचे आजार, आणि हृदयाचे आजार होऊ लागतात. 
 
चहाचे अधिक सेवनाने ऍसिड मुळे पोटफुगी, पोटदुखी, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस, अपचन, झोप न येणं, दात पिवळे होणं सारखे आजार उद्भवू लागतात. 
 
चहाचा अत्यधिक वापर केल्याने त्यामध्ये आढळलेले कॅफिन टॅनिन नावाचे विष चहाचे प्रभावाला अत्यंत उत्तेजक बनवते. याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. ज्या प्रमाणे चहा घेणाऱ्यांवर चहाचा नशा वाढत आहे त्याप्रमाणे हृदयाचे आजार आणि मानसिक आजार देखील वाढत आहेत.
 
कॅफीनच्या प्रभावामुळे हृदयाचे ठोके वाढतात ज्यामुळे हृदयाचे आजार वाढत आहे.